तासगाव : रूग्‍णालयातून एक दिवसाच्या बालकाचे अपहरण; घटना सीसीटीव्हीत कैद | पुढारी

तासगाव : रूग्‍णालयातून एक दिवसाच्या बालकाचे अपहरण; घटना सीसीटीव्हीत कैद

तासगाव; पुढारी वृत्तसेवा : रुग्णालयात कामास असणाऱ्या एका महिलेने येथील डॉ. अंजली पाटील यांच्या दवाखान्यातून एक दिवसाच्या बालकाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आज (रविवार) सकाळी हा प्रकार घडला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरॅत कैद झाली आहे. या घटनेने शहरात खळबळ माजली आहे.

या बाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की, येथील सिध्देश्वर चौकात डॉ. अंजली पाटील यांचे प्रसुतीचे खाजगी रुग्णालय आहे. या रुग्णालयात चिंचणी येथील हर्षदा शरद भोसले ही महिला प्रसूतीसाठी शुक्रवारी दाखल झाली होती. तिच्यावर सीझर करून शनिवारी ती महिला प्रसूत होऊन तिला पुरुष जातीचे बाळ जन्मले होते. बाळ बाळंतीण याची प्रकृती उत्तम होती.

दरम्‍यान, आज (रविवार) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नुकतीच दोन दिवसांपूर्वी कामावर आलेली एक नर्स ही कामानिमित्त बाळ बाळंतीण असणाऱ्या वार्ड मध्ये गेली. तिने कोणाचे लक्ष नसल्याची संधी साधून ते पुरुष जातीचे बाळ तिच्या काखेत असणाऱ्या पिशवीत घातले व त्या ठीकाणाहून पोबारा केला. या घटनेने हॉस्पिटलसह शहरात खळबळ उडाली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरॅत कैद झाली असून पोलीस सबंधित महिलेचा शोध घेत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button