सांगली : धरण परिसरात नवव्या दिवशीही धुवाँधार पाऊस | पुढारी

सांगली : धरण परिसरात नवव्या दिवशीही धुवाँधार पाऊस

सांगली ; पुढारी वृत्तसेवा : धरण परिसरात सलग नवव्या दिवशी धुवाँधार पाऊस सुरूच आहे. यामुळे धरणांत पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. धरणे गतीने भरू लागली आहेत. जिल्ह्यातही मध्यम पाऊस सलग आठव्या दिवशी सुरू आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरण भरत आल्याने तेथून प्रतिसेकंद एक लाख क्युसेक पाणी सोडले जात आहे.

कृष्णा खोरे पाणलोट क्षेत्रात मागील आठवड्यात सुरू झालेला पाऊस कायम आहे. विशेषत: धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. आज नवव्या दिवशी कोयना, नवजा, महाबळेश्वर, चांदोली धरण भागात अतिवृष्टी होत आहे. गेल्या 24 तासांत म्हणजे सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून ते मंगळवार सकाळी आठवाजेपर्यंत कोयना येथे 161, तर मंगळवारी दिवसभरात 34 मि.मी. पाऊस पडला. महाबळेश्वर येथेही वरीलप्रमाणे अनुुक्रमे 246 व 53 मि.मी. पावसाची नोंद झाली. नवजाला 204 व 30 मि.मी. पाऊस कोसळला. धोम येथे 32 व 6, कण्हेरला 38 व 5, तर चांदोलीत 88 व 11 मि.मी. पाऊस पडला.

यामुळे धरणांत पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. कोयनात प्रतिसेंकद 41 हजार क्युसेक पाणी येत आहे. केधरण सध्या 37 टीएमसी भरले आहे. धरण भरण्यास अजूनही 60टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे कोयनातून विसर्ग सुरू केलेला नाही. धोम धरण सहा टीएमसी भरले आहे. कण्हेरमध्ये चार टीएमसी पाणीसाठा झाला आहे.चांदोली धरण 20 टीएमसी भरले आहे. या धरणातून 807 क्युसेक पाणी प्रतिसेंकदाला वारणा नदीत सोडले जात आहे.

याबरोबरच जिल्ह्यातही आज मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. प्रामुख्याने शिराळा, वाळवा तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. शिराळा तालुक्यात 50.6 मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 14.1 मिमी पाऊस पडला. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जूनपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे : मिरज 8.4 (121.2), जत 3.1 (110.8), खानापूर-विटा 8.6 (118.4), वाळवा-इस्लामपूर 22.6 (147.5), तासगाव 7.5 (104.1), शिराळा 50.6 (376.9), आटपाडी 2.5 (81.0), कवठेमहांकाळ 5.2 (106.6), पलूस 10.9 (87.9), कडेगाव 16.3 (117.1).

धरण परिसरातील व जिल्ह्यातील ओढे, नाल्यातून पावसाचे पाणी नक्षंत येत असल्याने नक्षंची पातळी र्गीींनेवाढू लागली आहे. कृष्णा, वारणा, मोरणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडण्याची शक्यता आहे. सध्या पाणी इशारा पातळीकडे जात आहे.

विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फुटामध्ये पुढीलप्रमाणे : कृष्णा पूल (कराड) -11.11 (45), भिलवडी – 21 (53),आयर्विन पूल (सांगली) -18.1 (40) व अंकली पूल (हरिपूर)- 21.9 (45.11), राजापूर बंधारा -33 (58).

दरम्यान, महापुरास कारणीभूत ठरणारेकर्नाटकातील अलमट्टी धरण 87.992 टीएमसी भरले आहे. या धरणात महाराष्ट्रातून एक लाख चार हजार 852 क्युसेक पाणी जात आहे. तर या धरणातून एक लाख क्युसेक पाणी सोडले जात आहे.

Back to top button