

वारणावती; पुढारी वृत्तसेवा : चांदोली धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, संततधार कायम आहे. गेल्या 24 तासांत 60 मिलिमीटर तर आजअखेर 720 मिलिमीटर पावसाची येथे नोंद झाली.
गेल्या चार दिवसांत झालेली अतिवृष्टी आणि सुरू असणारी संततधार यामुळे चांदोली धरण सहा दिवसांतच 51 टक्के भरले आहे. सध्या धरणात 17.60 टीएमसी पाणीसाठा असून, त्याची टक्केवारी 51.16 आहे. पाणलोट क्षेत्रातून 11 हजार 185 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. चांदोलीत गेल्या सहा दिवसांपासून धुवाँधार पाऊस पडत आहे. पावसाने जोरदार सलामी दिल्याने धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा पाच दिवसात पाच टीएमसीने वाढला. सध्या धरणाची पाणीपातळी 607.00 मीटर झाली आहे. वीज निर्मिती केंद्रातून 765 क्युसेक विसर्ग वारणा नदीच्या पात्रात सुरू आहे.