सांगली : मॉर्निंग वॉकला गेलेली महिला दुचाकीच्या धडकेत ठार | पुढारी

सांगली : मॉर्निंग वॉकला गेलेली महिला दुचाकीच्या धडकेत ठार

विटा : पुढारी वृत्तसेवा : मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचा भरधाव दुचाकीच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (दि.१) पहाटे विटा – मायणी रस्त्यावर गार्डी हद्दीत घडली. सुवर्णा चंद्रकांत पाटील (वय ४५, रा. गार्डी) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी उमेश शिवाजी पाटील (सध्या रा. विटा, मूळ रा. चिखलहोळ, ता. खानापूर) याच्याविरोधात मृत महिलेचा भाचा रोहित कदम यांनी विटा पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, गार्डी येथील सुवर्णा पाटील शुक्रवारी पहाटे सव्वा पाच वाजता विटा – मायणी रस्त्यावर मॉर्निंग वॉक साठी गेल्या होत्या. त्यावेळी गार्डी गावाच्या हद्दीत ओढ्याच्या पुलाच्या पुढील वळणावर उमेश पाटील भरधाव मोटरसायकल (क्रमांक, एमएच १० डी एस-७१२९) वरून निघाले होते. त्यांच्या दुचाकीने सुवर्णा पाटील यांना पाठीमागून जोराची धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार उमेश पाटील हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी उमेश पाटील यांच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button