सोडून गेलेल्यांचा सेनेवर परिणाम होणार नाही;प्रा. नितीन बानुगडे-पाटील | पुढारी

सोडून गेलेल्यांचा सेनेवर परिणाम होणार नाही;प्रा. नितीन बानुगडे-पाटील

सांगली; पुढारी वृत्तसेवा: शिवसेनेमध्ये अनेक आले, अनेक गेले, याचा सेनेवर कधीही परिणाम झाला नाही, यापुढेही होणार नाही. शिवसैनिक हा संघटनेचा आत्मा आहे. त्यामुळे येणार्‍या काळामध्ये या कोणत्याही गोष्टींची तमा न बाळगता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी तयारीला लागा. त्यामध्ये आपली ताकद दाखवून द्या, असे आवाहन शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी केले.

जिल्ह्यातील सेनेच्या आजी- माजी पदाधिकार्‍यांचा मेळावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, संजय विभूते, महिला आघाडी जिल्हा संघटिका सुजाता इंगळे, बजरंग पाटील, सचिन कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. बानुगडे – पाटील म्हणाले, शिवसेनेचे शिवसैनिक नेहमीच बाळासाहेबांच्या शिवसेनेबरोबर राहिलेले आहेत. पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोडून गेलेल्यांचा सेनेवर परिणाम होणार नाही प्रा. नितीन बानुगडे-पाटील निवडणुकीसाठी तयारीला लागावे येथे झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत बोलताना प्रा. नितीन बानुगडे-पाटील. यावेळी आनंदराव पवार, संजय विभूते आदी. पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक त्यांच्या पाठिशी ठाम उभे आहेत.शिवसैनिकच आमदार, मंत्री घडवत असतात. जिल्ह्यातील शिवसेनाही मजबूत आहे. येणार्‍या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्व पदाधिकार्‍यांनी जिल्हा परिषद गट आणि गण यामध्ये बैठका, मेळावे घेऊन पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेली कामे ही जनतेपर्यंत घेऊन गेले पाहिजे. दोन लाखांपर्यंत कर्जमाफीचा विषय, नियमित कर्ज भरणार्‍यांना 50 हजार प्रोत्साहनपर अनुदान, बिनव्याजी तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज, कोरोना काळात मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय या सर्व बाबी लोकांच्यापर्यंत घेऊन शिवसैनिकांनी, पदाधिकार्‍यांनी जावे.

बैठकीस अनेक पदाधिकारी अनुपस्थित

शिवसेनेत फूट पडून आ. अनिल बाबर हे एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत. आनंदराव पवार यांनीही शिंदे गटात जाणार असे दोन दिवसांपूर्वी जाहीर केले होते. मात्र ते आजच्या बैठकीस उपस्थित होते. मात्र सेनेचे अनेक आजी-माजी पदाधिकारी बैठकीस अनुपस्थित होते.

 

Back to top button