वाळवा -शिराळ्यात ‘महाडिक पॅटर्न’ राबवणार : खा. धनंजय महाडिक | पुढारी

वाळवा -शिराळ्यात ‘महाडिक पॅटर्न’ राबवणार : खा. धनंजय महाडिक

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांसह इतर निवडणुकांमध्ये इस्लामपूर व शिराळ्यात ‘महाडिक पॅटर्न’ राबविणार आहे, असे प्रतिपादन राज्यसभेचे नूतन खा. धनंजय महाडिक यांनी केले.

पेठनाका येथे झालेल्या जाहीर सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खा. धनंजय महाडिक यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. स्व. नानासाहेब महाडिक यांच्या पुतळ्यास त्यांनी अभिवादन केले.

सी. बी पाटील, माजी आ. भगवानराव साळुंखे, महाराष्ट्र प्रदेश भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष राहुल महाडिक, महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यसमिती सदस्य सम्राट महाडिक, स्वरूपराव पाटील, जयसिंगराव शिंदे, माजी नगरसेवक विक्रम पाटील, माजी सभापती जगन्नाथ माळी, निजाम मुलाणी, विद्याताई पाटील उपस्थित होते.

खा. महाडिक म्हणाले, या यशाचे श्रेय महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्यासह भाजप नेते, बंधू राहुल अणि सम्राट व सामान्य कार्यकर्त्यांना जाते. या सर्वांच्या प्रयत्नामुळे हा विजय मिळाला.

राहुल महाडिक व सम्राट महाडिक म्हणाले, शिराळा व वाळवा तालुक्याचा विकास घडवण्यासाठी या पदाचा नक्कीच उपयोग होणार आहे.

यावेळी माजी नगरसेवक सतीश महाडिक, कपिल ओसवाल, अमीत ओसवाल, चेतन शिंदे, जयराज पाटील, राहुल कदम, तानाजी गुंड पाटील, डॉ. सचिन पाटील, माजी नगरसेवक केदार नलवडे, आर. एम. बागडी, महाडिक युवा शक्ती अध्यक्ष सुजित थोरात, बबन शिंदे, प्रा. महेश जोशी उपस्थित होते.

Back to top button