22-2-22 या तारखेचे औचित्य साधत इस्लामपुरात एकाचवेळी भरला 35 जुळ्यांचा मेळा

22--20-2022
22--20-2022
Published on
Updated on

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा
एकाच वेळी विविध वयोगटातील जुळ्यांना पाहणे हा दुर्मीळ योगायोग मंगळवारी
22-2-22 या तारखेला येथे साधला गेला. या उपक्रमात 35 जुळी व्यासपीठावर एकत्रित आली. त्यांनी आपले विविध कलाविष्कार सादर केले. चेहर्‍यातील प्रचंड साम्य आणि विविध वेशभूषेत आलेल्या जुळ्यांचा आविष्कार पाहून कार्यक्रमात रंगत आली.

मंगळवारी असणार्‍या 22-2-22 या तारखेचा योग साधून येथील एका शाळेने या उपक्रमाचे आयोजन केले होते. नुकत्याच जन्मलेल्या बालपणापासून 55 वर्षे वयाच्या व्यक्ती या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. योगा, डान्स, नाट्य, बडबडगीते, पोवाडा, पसायदान,बालगीते या जुळ्यांनी सादर केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news