वृक्षतोडीमुळे रोज 43 कोटी लिटर ऑक्सिजनची कमतरता

वृक्षतोडीमुळे रोज 43 कोटी लिटर ऑक्सिजनची कमतरता

सांगली : सुनील कदम :  मागील दहा वर्षांत देशात जवळपास 50 हजार किलोमीटर लांबीचे महामार्ग बांधले गेले आहेत. शिवाय सध्या 25 हजार किलोमीटर लांबीच्या महामार्गांची कामे सुरू आहेत. महामार्गांच्या या कामासाठी आजवर सुमारे 18 ते 19 लाख वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. परिणामी वातावरणात दररोज 43 कोटी लिटर ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्‍वभूमीवर याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्‍त करण्यात येत आहे.

मानवी जीवनात आक्सिजनचे महत्व अनन्यसाधारण आहे, म्हणून तर त्याला प्राणवायू म्हणतात. मनुष्य दिवसभरात जे काही ग्रहण करतो, त्यातील 75 टक्के भाग ऑक्सिजनचा असतो. सामान्य व्यक्ती दिवसाकाठी 500 ते 550 किलो ऑक्सिजन ग्रहण करतो. माणसाच्या शरीरातील सर्व भागांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन अर्थात प्राणवायूचा पुरवठा झाला, तरच शरीर योग्य काम करू शकते. मानवी शरीराला अन्न आणि पाण्यातून अवघी 10 टक्के ऊर्जा मिळते तर उर्वरित 90 टक्के ऊर्जा ऑक्सिजनमुळे मिळते. सामान्यतः शरीरात ऑक्सिजनचा स्तर 95 ते 100 टक्के इतका असतो. जेव्हा हा स्तर 90 टक्क्यांपेक्षा खाली जातो, तेव्हा शरीरात ऑक्सिजनची कमतरता आहे असे मानले जाते. यावरून मानवी जीवनातील आक्सिजनचे महत्व अधोरेखित होते.

पृथ्वीच्या वायुमंडलात सुमारे सहा लाख अब्ज टन हवा आहे. त्यातील 78 टक्के भाग नायट्रोजनचा आहे. उर्वरित भागात 21 टक्के ऑक्सिजन, 0.03 टक्के कार्बनडाय ऑक्साइड आणि 0.97 टक्के अन्य वायू आहेत. वातावरणात ऑक्सिजनची निर्मिती वृक्ष या एकमेव घटकाकडून केली जाते. पूर्ण वाढ झालेला आणि भरपूर पर्णसंभार असलेला एक वृक्ष दिवसाकाठी 230 लिटर ऑक्सिजनची निर्मिती करतो. त्यामुळे वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण पुरेसे असण्यासाठी त्या प्रमाणात वृक्ष असण्याची गरज आहे. मात्र आजकाल वेगवेगळ्या कारणासाठी प्रचंड प्रमाणात वृक्षसंहार सुरू आहे. त्यातील एक वाटा देशातील महामार्गांचाही आहे.

गेल्या दहा वर्षात देशात जवळपास 50 हजार किलोमिटर लांबीचे महामार्ग बांधले गेले असून आणखी 25 हजार किलोमिटर महामार्गांची कामे चालू आहेत. याशिवाय दररोज 68 किलोमिटर आणि वर्षाला 18 हजार किलोमिटर या प्रचंड वेगाने महामार्गांची कामे चालू आहेत. एक किलोमिटर लांबीचा महामार्ग बांधण्यासाठी जवळपास 25 वृक्षांची कत्तल होते. या हिशेबाने गेल्या दहा वर्षात 18 लाख 75 हजार झाडे तोडण्यात आली आहेत.

पूर्ण वाढ झालेले एक झाड दिवसाला सुमारे 230 लिटर ऑक्सिजन वातावरणात सोडते. ही बाब विचारात घेता महामार्गांसाठी झालेल्या वृक्षतोडीमुळे वातावरणात दररोज 43 कोटी 12 लाख 50 हजार लिटर ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आहे, असे वनस्पती शास्त्रज्ञांचे मत आहे. कोरोना काळात केवळ ऑक्सिजनअभावी हजारो लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. अशा परिस्थितीत महामार्गांसाठी होणारी वृक्षतोड आणि पर्यायाने होणारी प्राणवायूची हानी देशासाठी चिंताजनक आहे.

मानवी जीवनात आक्सिजनचे महत्व अनन्यसाधारण आहे, म्हणून तर त्याला प्राणवायू म्हणतात. मनुष्य दिवसभरात जे काही ग्रहण करतो, त्यातील 75 टक्के भाग ऑक्सिजनचा असतो. सामान्य व्यक्ती दिवसाकाठी 500 ते 550 किलो ऑक्सिजन ग्रहण करतो. माणसाच्या शरीरातील सर्व भागांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन अर्थात प्राणवायूचा पुरवठा झाला, तरच शरीर योग्य काम करू शकते. मानवी शरीराला अन्न आणि पाण्यातून अवघी 10 टक्के ऊर्जा मिळते तर उर्वरित 90 टक्के ऊर्जा ऑक्सिजनमुळे मिळते. सामान्यतः शरीरात ऑक्सिजनचा स्तर 95 ते 100 टक्के इतका असतो. जेव्हा हा स्तर 90 टक्क्यांपेक्षा खाली जातो, तेव्हा शरीरात ऑक्सिजनची कमतरता आहे असे मानले जाते. यावरून मानवी जीवनातील आक्सिजनचे महत्व अधोरेखित होते.

पृथ्वीच्या वायुमंडलात सुमारे सहा लाख अब्ज टन हवा आहे. त्यातील 78 टक्के भाग नायट्रोजनचा आहे. उर्वरित भागात 21 टक्के ऑक्सिजन, 0.03 टक्के कार्बनडाय ऑक्साइड आणि 0.97 टक्के अन्य वायू आहेत. वातावरणात ऑक्सिजनची निर्मिती वृक्ष या एकमेव घटकाकडून केली जाते. पूर्ण वाढ झालेला आणि भरपूर पर्णसंभार असलेला एक वृक्ष दिवसाकाठी 230 लिटर ऑक्सिजनची निर्मिती करतो. त्यामुळे वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण पुरेसे असण्यासाठी त्या प्रमाणात वृक्ष असण्याची गरज आहे. मात्र आजकाल वेगवेगळ्या कारणासाठी प्रचंड प्रमाणात वृक्षसंहार सुरू आहे. त्यातील एक वाटा देशातील महामार्गांचाही आहे.

गेल्या दहा वर्षात देशात जवळपास 50 हजार किलोमिटर लांबीचे महामार्ग बांधले गेले असून आणखी 25 हजार किलोमिटर महामार्गांची कामे चालू आहेत. याशिवाय दररोज 68 किलोमिटर आणि वर्षाला 18 हजार किलोमिटर या प्रचंड वेगाने महामार्गांची कामे चालू आहेत. एक किलोमिटर लांबीचा महामार्ग बांधण्यासाठी जवळपास 25 वृक्षांची कत्तल होते. या हिशेबाने गेल्या दहा वर्षात 18 लाख 75 हजार झाडे तोडण्यात आली आहेत. पूर्ण वाढ झालेले एक झाड दिवसाला सुमारे 230 लिटर ऑक्सिजन वातावरणात सोडते. ही बाब विचारात घेता महामार्गांसाठी झालेल्या वृक्षतोडीमुळे वातावरणात दररोज 43 कोटी 12 लाख 50 हजार लिटर ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आहे, असे वनस्पती शास्त्रज्ञांचे मत आहे. कोरोना काळात केवळ ऑक्सिजनअभावी हजारो लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. अशा परिस्थितीत महामार्गांसाठी होणारी वृक्षतोड आणि पर्यायाने होणारी प्राणवायूची हानी देशासाठी चिंताजनक आहे.

एक झाड तोडले तर पाच झाडे लावणे बंधनकारक

महामार्गाचे काम करीत असताना एक झाड तोडले तर त्याच्या बदल्यात पाच-दहा झाडे संबंधित ठेकेदाराने लावणे बंधनकारक आहे. मात्र, कायद्यातील ही तरतूद कागदावरच राहिलेली दिसते. परिणामी ज्या ज्या भागातून महामार्ग गेले आहेत, ते सगळे भाग वृक्षतोडीमुळे उजाड झालेले दिसून येतात. हे असेच चालू राहिले तर आणखी काही वर्षांत केवळ महामार्गांमुळे देशाच्या वातावरणात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होण्याची भीती व्यक्‍त करण्यात येत आहे.

झाडे आणि ऑक्सिजनची रंजक माहिती!

पिंपळ, कडुलिंब, तुळस, वड आणि बांबू ही झाडे इतर झाडांच्या तुलनेत 30 टक्के अधिक ऑक्सिजन देतात. वड, पिंपळ, तुळस ही झाडे 24 पैकी 20 तासांपेक्षा अधिक ऑक्सिजन देतात.

पूर्ण वाढलेले एक झाड दिवसाला सरासरी 230 लिटर ऑक्सिजन निर्मिती करते. एका व्यक्‍तीला दररोज 550 लिटर ऑक्सिजनची गरज असते. म्हणजेच प्रत्येकी किमान 3 झाडांची गरज आहे.

पृथ्वीवरून केवळ पाच सेकंदांसाठी ऑक्सिजन गायब झाला तर पृथ्वीवर हाहाकार माजेल. पृथ्वी प्रचंड थंड होईल. धातूंचे तुकडे वेल्डिंग न करता एकमेकांना जोडले जातील. जगातील 21 टक्के ऑक्सिजन गायब झाला तरी आपल्या सर्वांचे कानाचे पडदे फाटतील. काँक्रिटच्या इमारती जमीनदोस्त होतील आणि समुद्राचे सर्व पाणी वाफ बनून गायब होईल.

वृक्षसंहार तातडीने रोखण्याची गरज!

सध्या महामार्गांसाठी ज्या वेगाने वृक्षसंहार सुरू आहे, तो तातडीने रोखण्याची गरज आहे. आता झाडे तोडून त्याच्या बदल्यात भलेही दुसरी झाडे लावली जातील, पण ती झाडे पूर्ण वाढायला 50 वर्षांचा कालावधी जाईल. दरम्यानच्या कालावधीत जे काही परिणाम होतील ते भयावह असतील. तापमानात सरासरी दोन डिग्री सेल्सिअसने वाढ होईल, ती सहन करणे शक्य होणार नाही. त्यामुळे कोणत्याही पातळीवर सध्या सुरू असलेली वृक्षतोड तातडीने थांबविण्याची गरज आहे. महामार्गांमुळे आपला जेवढा फायदा होणार आहे, त्याच्या कित्येक पटींनी वृक्षतोडीमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.
– डॉ. मधुकर बाचुळकर, ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ 

logo
Pudhari News
pudhari.news