सांगली : ‘एलसीबी’मध्ये कोण येणार? | पुढारी

सांगली : ‘एलसीबी’मध्ये कोण येणार?

सांगली : पुढारी वृत्तसेवा
स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) विभागाचे पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड 31 मे रोजी निवृत्त होत आहेत. त्यांची जागी कोणाची वर्णी लागणार, याबद्दल पोलिस दलात जोरदार चर्चा सुरू आहे. एलसीबीला हद्दीची मर्यादा नाही. जिल्हाभर ते काम करू शकतात. 80 जणांचा सध्या स्टाफ आहे. त्यामुळे येथे येण्यासाठी अनेक अधिकार्‍यांची आतापासून धडपड सुरू झाली आहे. काहींनी राजकीय वजन वापरण्याचा प्रयत्न केला आहे. 31 मेपर्यंत काही अधिकार्‍यांचा जिल्ह्यातील कार्यकाल पूर्ण होत आहे.

नवीन अधिकारी दाखल होतील. त्यामुळे जिल्हा पोलिस प्रमुख दीक्षित गेडाम हे जुन्या अधिकार्‍यांना या विभागात संधी देणार का, नवीन येणार्‍या अधिकार्‍याची नियुक्ती करणार, याकडेही सार्‍यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. गुन्हेगारीत वाढ झाली आहे. त्यामुळे येथे खमक्या अधिकार्‍याची गरज आहे. चोरी, घरफोडी, लुटमारीच्या गुन्ह्यांची मालिका सुरू आहेत. खबर्‍यांचे नेटवर्क कमी झाले आहे. नवे गुन्हेगार रेकॉर्डवर नाहीत. त्यामुळे एलसीबीत अनुभवी अधिकार्‍याची नियुक्ती होण्याची गरज
आहे.

Back to top button