हनुमान चालीसा, भोंग्यांवरून समाजात तेढ; जयंत पाटील यांचा आरोप | पुढारी

हनुमान चालीसा, भोंग्यांवरून समाजात तेढ; जयंत पाटील यांचा आरोप

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : हनुमान चालीसा आणि भोंग्यांची भाषा करून समाजात तेढ निर्माण करण्याचा उद्योग काही मंडळी करीत आहेत. मात्र त्यांचा या मागील हेतू काय? हे सुज्ञ जनतेने ओळखले आहे. त्यांचा हा डाव राज्यातील जनताच उधळून लावेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथील इफ्तार पार्टीत बोलताना व्यक्त केला.

इस्लामपूर येथील ख्वॉजा गरीब नवाज सोशल ट्रस्टच्यावतीने मुस्लिम मोहल्ला येथे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. याप्रसंगी ते बोलत होते. माजी नगरसेवक पीरअली पुणेकर, माजी नगराध्यक्ष मुनीर पटवेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अ‍ॅड. चिमण डांगे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, महिला शहराध्यक्षा रोझा किणीकर, युवक शहराध्यक्ष सचिन कोळी उपस्थित होते.

ना. पाटील पुढे म्हणाले, काही मंडळी हनुमान चालीसा आणि भोंग्यांची भाषा करीत आहेत. या मंडळींचा हेतू शुद्ध नाही. त्यांना यातून समाजात तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजायची आहे, हे स्पष्ट आहे.

शहाजी पाटील, माजी नगरसेवक विश्वासराव डांगे, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्राम जाधव, कार्याध्यक्ष देवराज देशमुख, रफिक पठाण, शकील जमादार, आयुब हवलदार, अबिद मोमीन, रफिक लांडगे, अनिस मोमीन, हमीद लांडगे, फिरोज लांडगे, अल्ताफ मोमीन, मासुम गणीभाई उपस्थित होते.

Back to top button