सांगली : पुढारी वृत्तसेवा : जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल जाफर जमीर ऊर्फ जमाल नदाफ (वय 19, रा. हनुमाननगर) याला 20 वर्षे सक्तमजुरी व 15 हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी सुनावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रियाज जमादार यांनी काम पाहिले.
31 डिसेंबर 2019 रोजी पीडित मुलगा सांगली येथे त्याच्या शाळेतील प्रोजेक्टसाठी बॅटरी आणण्यासाठी गेला होता. रस्त्यात आरोपीने त्याला थांबवले व 'माझा मोबाईल हरवला आहे, शोधूया चल,' असे म्हणून त्याने पीडित मुलाला शाळेच्या आवारातील शौचालयामध्ये नेले. त्या ठिकाणी त्याला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले.
घरी आल्यानंतर पीडित मुलाने घरच्या लोकांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. पीडित मुलाच्या वडिलांनी याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली. सहायक पोलिस निरीक्षक एस. डी. आम्बले यांनी तपास करून आरोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. पीडित मुलगा व डॉ. प्रतिक चोटालिया यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. हवालदार इम्रान महालकरी व वंदना मिसाळ यांनी सरकार पक्षाला मदत केली.
न्यायालयाने जाफर नदाफ याला भादवि कलम 376 अन्वये 5 वर्षे सक्तमजुरी व 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिने जादा सक्तमजुरीची शिक्षा, तसेच पोक्सो कायदा कलम 6 अन्वये 20 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा, दंड न भरल्यास एक वर्ष जादा सक्तमजुरीची शिक्षा भोगण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
आले. पीडित मुलगा व डॉ. प्रतिक चोटालिया यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. हवालदार इम्रान महालकरी व वंदना मिसाळ यांनी सरकार पक्षाला मदत केली. न्यायालयाने जाफर नदाफ याला भादवि कलम 376 अन्वये 5 वर्षे सक्तमजुरी व 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिने जादा सक्तमजुरीची शिक्षा, तसेच पोक्सो कायदा कलम 6 अन्वये 20 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा, दंड न भरल्यास एक वर्ष जादा सक्तमजुरीची शिक्षा भोगण्याचे आदेश न्यायालयाने दिले.