सांगली : अ‍ॅग्री पंढरी प्रदर्शनात ‘ऑर्बिट’च्या उत्पादनांना प्रतिसाद | पुढारी

सांगली : अ‍ॅग्री पंढरी प्रदर्शनात ‘ऑर्बिट’च्या उत्पादनांना प्रतिसाद

सांगली, पुढारी वृत्तसेवा :  ‘पुढारी’ माध्यम समूह व महाराष्ट्र शासन कृषी विभाग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘अ‍ॅग्री पंढरी 2022’ या प्रात्यक्षिक कृषी प्रदर्शनाचे ऑर्बिट क्रॉप सायन्स हे मुख्य प्रायोजक होते. प्रदर्शनामध्ये ऑर्बिट क्रॉप सायन्सच्या सर्व सूक्ष्म अन्नद्रव्ये व मिश्र खते तसेच बी-बियाणे आणि उत्कृष्ट उत्पादन घेतलेल्या शेतकर्‍यांची उत्पादने व पिके कंपनीतर्फे सादर करण्यात आली होती. या उत्पादनांची माहिती व बियाण्यांची खरेदी शेतकर्‍यांनी या दरम्यान आवर्जून केली.

कंपनीच्या खत व औषधांची संपूर्ण माहिती व प्रात्यक्षिके प्रत्यक्ष प्लॉटमध्ये जाऊन पिकाची गुणवत्ता बघून करून घेतले. यामध्ये ऑर्बिट क्रॉप सायन्सच्या तज्ज्ञांनी प्रात्यक्षिक प्लॉटमध्ये वापरलेल्या खतांची मात्रा व त्याचे महत्त्व व वेगवेगळ्या पिकांच्या अवस्थेमध्ये कोणती खते व उत्पादने वापरावीत याबद्दलचे मार्गदर्शन केले. द्राक्ष, ऊस व भाजीपाला उत्पादनामध्ये ऑर्बिट क्रॉप सायन्सची उत्पादने अतिशय उपयुक्त आहेत. ऑर्बिट क्रॉपच्या खते व औषधे यांचा दर्जा गेली 22 वर्षे टिकून ठेवल्याचे कंपनीचे चेअरमन दीपक राजमाने यांनी सांगितले.

दरम्यान, ऑर्बिट क्रॉप सायन्सच्या खतांची मात्रा दिल्यामुळे प्रात्यक्षिक पिकातील प्लॉटची गुणवत्ता सर्वात चांगली होती, याचे शेतकर्‍यांनी कौतुक केले. प्रदर्शनामध्ये ऑर्बिट क्रॉप सायन्सच्या स्टॉलला सांगलीसह कोल्हापूर, सातारा, पुणे, सोलापूर, सांगोला, अमरावती, सिंधुदुर्ग, तसेच रत्नागिरी जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक शेतकर्‍यांनी भेट दिली. अशाप्रकारचे प्रात्यक्षिक प्रदर्शन बनवण्याची अपेक्षा शेतकरी पुढारी माध्यम समूह वऑर्बिट क्रॉप सायन्सेस यांना केली.

हेही वाचलंत का?

Back to top button