सांगली : अ‍ॅग्री पंढरी प्रदर्शनाच्या स्टॉल्स बुकिंगला प्रतिसाद

सांगली : अ‍ॅग्री पंढरी प्रदर्शनाच्या स्टॉल्स बुकिंगला प्रतिसाद

Published on

सांगली : पुढारी वृत्तसेवा : पुढारी माध्यम समूह आणि राज्य शासनाच्या सांगली जिल्हा कृषी विभागातर्फे 15 ते 19 एप्रिलदरम्यान सांगली येथे 'अ‍ॅग्री पंढरी' कृषी प्रदर्शन होत आहे. हे प्रदर्शन स्वत:च प्रतिसादाची एक हमी असल्याने प्रदर्शनातील स्टॉल्स बुकिंग जवळपास पूर्ण होत आले आहे. आता मोजकेच स्टॉल्स शिल्लक आहेत. 'ऑर्बिट क्रॉप सायन्स' या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक, 'रॉनिक स्मार्ट', 'दी कुटे ग्रुप' सहप्रायोजक, तर 'केसरी' हे ट्रॅव्हल पार्टनर आहेत.

प्रदर्शनाचे स्वरूप एका अर्थाने एकात्मिक आहे. 'हा सूर्य हा जयद्रथ' अशा स्वरूपाचे हे प्रदर्शन आहे. जेथे माहिती दिली जाईल, तेथेच प्रात्यक्षिकेही पाहायला मिळतील. कमी कालावधीत भरपूर फळ पिके, फूल पिके, फळभाजी, पालेभाजी पिके घेण्याचे अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकर्‍यांना सधन करण्याच्या एकमेव उद्दिष्टासह सप्रात्यक्षिक उभे आहे. शेतीशी निगडित उत्पादक-व्यावसायिकांना थेट शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविणारे व्यासपीठही इथे उपलब्ध आहे.

सांगलीतील विजयनगरात जिल्हाधिकारी कार्यालयामागे सांगली-मिरज रोडवर कृषी विभागाच्या विस्तीर्ण जागेत हिरवाईचा हा उत्सव सलग 5 दिवस सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत चालणार आहे. कृषी विकासासाठी अद्ययावत माहिती यादरम्यान दररोज आयोजित ज्ञानसत्रांतून दिली जाईल. शेतकर्‍यांचा जमिनीकडे पाहण्याचा द‍ृष्टिकोन सकारात्मक करून सोडणारी ही ज्ञानसत्रे असतील.
दोडका, भेंडी, कारले, ढबू मिरची, कलिंगड, झेंडूची फुले आदींसह 50 वर नानाविध देशी-विदेशी पिकांचे बहरलेले प्लॉट इथे बघायला मिळतील. या तंत्रज्ञानाचे अनुकरण नक्‍कीच मातीचे पांग फेडणारे ठरणार आहे. उदाहरण सांगायचे झाले तर 'झुकेनी' हे असेच एक पीक येथे घेण्यात आलेले आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये सॅलडमधून ते हमखास पाहायला मिळते. तसेच 'कृषिउपयोगी ड्रोन'ही या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क : 9850844271 आणि 9766213003.

ड्रोनचे प्रात्यक्षिक, प्रदर्शनाचे आकर्षण

ड्रोनने औषध फवारणी आदी शेतीकामे कशी होतात, ते येथे बघायला मिळेल. शिवाय खते, ठिबक, बी-बियाणे, कीटकनाशके, मल्चिंग पेपर असे बरेच काही असेल. खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, दोन पिकांमधील अंतर, सेंद्रिय शेतीबद्दल मार्गदर्शनासह ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, ब्लोअर, रोप लावणी यंत्रांसह कृषी अवजारांचे अनेक अद्ययावत प्रकार प्रात्यक्षिकांसह उपलब्ध असतील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news