सांगली : जयंतरावांच्या फाईल्स जनतेच्या दरबारात उघडल्या जातील | पुढारी

सांगली : जयंतरावांच्या फाईल्स जनतेच्या दरबारात उघडल्या जातील

सांगली : पुढारी वृत्तसेवा

‘काश्मिर फाईल्स’ चित्रपटासंदर्भात पालकमंत्री जयंत पाटील यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. जयंत पाटील यांच्या फाईल्स मात्र जनतेच्या दरबारात उघडल्या जातील. त्यांना राजकारणातून विस्थापित व्हावे लागेल, असा इशारा भाजपचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार यांनी दिला.

पवार म्हणाले, काश्मिरी पंडितांनी ज्या यातना सहन केल्या त्याची जाणीव जयंतरावांना असण्याचे कारण नाही. तसेच संघर्षातून उभा राहिलेला सर्वोदय व जतचा डफळे कारखाना पाटील यांनी बळकावला. दोन्हीकडील 41 हजार सभासदांना व अनेक कर्मचार्‍यांना वार्‍यावर सोडले. वेळ बलवान असते. प्रत्येक फाईल कधी ना कधी उघडत असते. लॉटरी फाईल, व्हॅट फाईल, कारखाने विक्री फाईल अशा अनेक फाईल्स आहेत. पवार म्हणाले, नवाब मलिक यांना पाठीशी घालणार्‍या पक्षाचे जयंत पाटील अध्यक्ष आहेत. त्यांना देश, देशहितापेक्षा पक्षाचे आणि सत्तेचे हित महत्वाचे आहे. पृथ्वीराज पवार यांचा इशारा : काश्मिर फाईल्सवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही

Back to top button