सराफाचा शेतकर्‍याला साडेतेरा लाखांचा गंडा

बिळाशी येथील प्रकार; मुलीच्या दागिन्यांसाठी दिलेली रक्कम घेऊन पलायन
13.5 Lakhs of bullion to the farmer
सराफाचा शेतकर्‍याला साडेतेरा लाखांचा गंडाPudhari File Photo
Published on
Updated on

कोकरूड : पुढारी वृत्तसेवा

बिळाशी (ता. शिराळा) येथे मुलीच्या लग्नाचे दागिने बनविण्यासाठी दिलेली 13 लाख 50 हजार रुपयांची रक्कम घेऊन सराफाने पलायन केले. याप्रकरणी बाळू ज्ञानू पाटील (रा. बिळाशी) यांनी कोकरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सराफ आनंदा ऊर्फ नागेश हनुमंत पोतदार (रा. बिळाशी) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. फसवणुकीचा हा प्रकार 26 एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2024 या कालावधीत घडला.

13.5 Lakhs of bullion to the farmer
बेळगावकरांना 17 कोटींचा गंडा!

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, बाळू पाटील हे शेती करतात. त्यांनी मुलीच्या लग्नात दागिने करण्यासाठी नागेश याला 13 लाख 50 हजार रुपये दिले होते. मात्र, काही दिवसांपासून नागेश हा त्यांना दागिने देण्यास टाळाटाळ करत होता. तसेच पैशाची मागणी केली असता उडवाउडवीची उत्तरे देत होता. बाळू पाटील त्याच्या घराकडे गेले असता, त्याचे घर बंद होते. त्याचा मोबाईलही बंद होता. त्यानंतर पाटील यांनी याबाबत फिर्याद दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news