बेळगावकरांना 17 कोटींचा गंडा!

ऑनलाईन लुबाडणूक ः नऊ महिन्यांतच 8 कोटींची फसवणूक
Online Fraud News in Belgaon
बेळगावकरांना 17 कोटींचा गंडा!Pudhari Photo
Published on
Updated on

बेळगाव ः पुढारी वृत्तसेवा

आमिषाला बळी पडून फसणारे अधिक असल्याने ऑनलाईन फसवणूक दिवसागणीक वाढते आहे. दरवेळी नवनवीन शक्कल लढवत ऑनलाईन भामट्यांची करामत सुरूच आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये बेळगावकरांची तब्बल 17 कोटी 3 लाख रुपयांची भामट्यांनी फसवणूक केली आहे. ‘सीईएन’मध्ये नोंद झालेली आकडेवारी हे सांगते. विशेष म्हणजे 2022 व 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये अवघ्या नऊ महिन्यांत यापैकी निम्म्या म्हणजे सुमारे 9 कोटींची फसवणूक झाली आहे!

द्राक्षबागायतदारांची कोट्यवधींची लुबाडणूक 

मध्यमवर्गीयांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांसमोर आज आपला मौल्यवान ऐवज व रक्कम नेमकी सुरक्षित कुठे? असा नेहमीच प्रश्न पडत आहे. सोने, पैसे घरी ठेवले, तर चोरट्यांची भीती आणि रक्कम बँकेत ठेवायची, तर ऑनलाईन दरोडेखोरांची भीती, अशी द्विधा स्थिती सध्या दिसून येते. आता ऑनलाईन गंडा घालण्याचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण आता इतके वाढत आहे की, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा ते दुप्पट झाले आहे.

फसणारे कमी, रक्कम मोठी

2022 मध्ये 90 जणांची सुमारे 5 कोटींची फसवणूक झाली होती. 2023 मध्ये फसणारे 64 तर रक्कम सुमारे साडेतीन कोटींची होती. परंतु, गेल्या 9 महिन्यांतील फसणार्‍यांची संख्या अवघी 60 आहे. परंतु, ऑनलाईन हडपलेली रक्कम तब्बल नऊ कोटींची आहे. यावरून फसणारे कमी झाले असले, तरी फसवणुकीच्या रकमेचा आकडा दुप्पटीने फुगलेला दिसून येतो.

आमिषाला बळीचा परिणाम

फसलेले लोक कमी परंतु, हा आकडा वाढण्याचे मुख्य कारण हे कमी कालावाधीत अधिक नफा या आमिषाला बळी पडल्याचा हा परिणाम दिसून येतो. वर्षभरात ऑनलाईन भामट्यांनी फसवण्याचा अगदी सोपा मार्ग निवडलेला दिसून येतो. सध्या देशभरात शेअर मार्केट गुंतवणुकीचे वारे जोरात वाहत आहे. याचाच फायदा उठवत भामट्यांनी अनेकांना लाखो रुपयांना गंडा घातला आहे. गेल्या नऊ महिन्यांमध्ये फसलेल्यांमध्ये अधिकांश प्रमाण हे शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीतून अधिक नफा देण्याच्या आमिषाचे झाल्याचे दिसून येत आहे.

उच्च शिक्षित जाळ्यात

शेअर मार्केटचे ज्ञान असणारे बहुतांशी उच्च शिक्षित पान आहेत. त्यांना कमी कालावधीत अधिक नफ्याचा भुलभुलैय्या नडल्याचे दिसून येते. भामटे अशा सावजाला एखाद्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपमध्ये सामील करून घेतात. यानंतर तुमच्या बँक खात्यात किती रक्कम क्रेडिट झाली हे तपासा, असे सांगत मृगजळ निर्माण करतात. हळुहळू याकडे आकर्षित झालेली व्यक्ती आपल्या खात्यावरील मोठी रक्कम गमावून बसते. अनेकांनी 5 लाखांपासून 60 लाखांपर्यंत रक्कम गमावल्याची नोंद सीईएन पोलिस विभागाकडे आहे.

फसू नका, पुंजी गमवाल

तीन वर्षांत अधिकृत नोंदणी झालेल्या 214 बेळगावकरांना तब्बल 17 कोटींचा ऑनलाईन गंडा बसला आहे. तर परत मिळालेली रक्कम अवघी अडीच कोटींची आहे. शिवाय गोठवलेली रक्कम सुमारे 11 कोटींची आहे. या गोठवलेल्या रक्कमेतून संबंधितालाच रक्कम मिळेल याची शाश्वती नाही. हे साडेतेरा कोटी वगळता साडेतीन कोटींची रक्कम बुडाली आहे. याचा अर्थ आपल्या कष्टाची पुंजी गेली तर ती परत मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. कारण, ऑनलाईन भामटे कुठे बसून फसवतात, याचा शोध घेईपर्यंत पोलिसांच्या नाकीनऊ येते. त्यामुळे फसू नका, असे आवाहन पोलीस खात्याने केले आहे.

Online Fraud News in Belgaon
जालना : ऑनलाईन फसवणूकीतील चाळीस हजार मिळाले परत

जागृतीसाठी आकडेवारी

ऑनलाईन फसल्याच्या तक्रारी ‘सीईएन’कडे दररोज किमान 8 ते 10 येतात. यामध्ये बहुतांशी जणांची 5 ते 20 हजारांची फसवणूक झालेली असते. त्याची दप्तरी नोंद करून घेतली जाते. परंतु, एफआयआर नोंद होत नाही. ज्यांना मोठ्या रकमेला लुबाडले जाते, त्याचा एफआयआर नोंद होतो. त्याची बातमी आली तरी जनतेत फारशी जागृती होत नाही. पुन्हा अनेकजण अशाच आमिषाला बळी पडतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news