तासगाव : राजकीय हालचालींना वेग : एप्रिलमध्ये होणार निवडणुका

तासगाव : राजकीय हालचालींना वेग : एप्रिलमध्ये होणार निवडणुका

तासगाव, पुढारी वृत्तसेवा :
तासगाव नगरपालिकेची प्रभाग रचना दि. 10 मार्चरोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. मंगळवारी याबाबतचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला. दरम्यान, शहराची गेल्या पाच वर्षांतील परिस्थिती पाहता यंदाची निवडणूक ही विकासकामांवर लढली जाणार, असे संकेत मिळत आहेत.

तासगाव नगरपालिकेत भाजपची गेली सात वर्षे सत्ता होती. तत्पूर्वी राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. मात्र, दोन्ही गटांकडून विकासकामे करण्यात आली नाहीत, त्यामुळे तासगावकरांच्या पदरी निराशा आली. गेल्या दहा वर्षांत तासगाव शहराचा विकास नसल्याने शहर आजही अन्य शहरांच्या तुलनेत खूप मागे पडले आहे. मात्र, याचे नेते आणि पदाधिकारी यापैकी कोणालाच काही देणे-घेणे राहिले नसल्याचे चित्र दिसते. प्रत्यक्षात शहरात विकास करण्यासाठीचे बरेच मुद्दे होते. मात्र, सत्ताधारी गटाने केवळ निधीची उधळपट्टी केली. प्रमुख कामे 'जैसे थे' ठेवून गरज नसलेल्या कामांवर पैसा उधळला असा विरोधकांचा आरोप आहे.

आघाडी होणार की बिघाडी?

राष्ट्रवादीच्या आक्रमक भूमिकेमुळे शहरात काँग्रेस, शिवसेना व इतर पक्षांना नेमकी भूमिका घेणे अवघड झाले आहे. तर कवठेमहांंंंकाळ येथील विजयाची हवा डोक्यात गेल्यामुळे राष्ट्रवादीकडून आघाडी करण्याबाबतची शंका धुसर दिसत आहे. त्यामुळे भाजप, राष्ट्रवादी आणि इतर सर्व पक्ष अशी तिरंगी निवडणूक होण्याची शक्यता बळावली आहे.

बदल होण्याची गरज

तासगावकरांनी राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही गटांना सत्तेची संधी दिली. मात्र, संधीचे स्वतःसाठीच दोन्ही गटांनी सोने केले असा आक्षेप आहे. सत्ताकाळात यात शहराच्या विकासाचा मात्र सोयीस्कर बळी गेला. त्यामुळे शहरात आता तिसरा पर्याय मिळावा, अशी अपेक्षा आता नागरिकांमधूनच व्यक्‍त होत आहे. त्यामुळे काँग्रेस, शिवसेना यांच्यासह अन्य पक्षांची आघाडी झाल्यास जोरदार लढतीची शक्यता नाकारता येत नाही.

रशिया -युक्रेन युद्ध :पुढे काय होणार?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news