सांगली : विवाहितेचा हुंड्यासाठी मानसिक छळ, जबरदस्तीने गोळ्या चारून गर्भपात; ५ जणांवर गुन्हा | पुढारी

सांगली : विवाहितेचा हुंड्यासाठी मानसिक छळ, जबरदस्तीने गोळ्या चारून गर्भपात; ५ जणांवर गुन्हा

जत, पुढारी वृत्तसेवा : सोन्याळ येथे एका २१ वर्षीय विवाहितेस सासरच्या मंडळीने लग्नात योग्य मानपान केले नाही म्हणून माहेरकडून १ लाख रुपये व सोने आण म्हणून मानसिक त्रास व विवाहितेच्या संमतीशिवाय तिचा गर्भपात केल्याची घटना घडली आहे. विवाहतेचा मानसिक, शारीरिक छळ, व मुलगा पाहिजे म्हणून विवाहितेला जबरदस्तीने गोळ्या चारल्याने गर्भपात झाला. याप्रकरणी पती, सासू , सासरे, दीर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संबंधित विवाहितीने उमदी पोलिसात फिर्याद दिली आहे. (Sangli)

 पती दुडाप्पा नीलाप्पा बिरादार, सासू सुगलाबाई नीलाप्पा बिरादार, सासरे नीलाप्पा दुडाप्पा बिराजदार, दीर विठ्ठल नीलाप्पा बिराजदार, दीर धरेप्पा नीलाप्पा बिरादार (सर्व रा. सोन्याळ) अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे असून या पाचजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सोन्याळ येथे एका विवाहिते चे लग्न २०१८ मध्ये झाले होते. लग्नात पती दुडाप्पा बिरादार, यास हिंदू रितीरिवाजाप्रमाणे मानपान केला होता. असे असतानाही असे पत्नीला माहेर कडून एक लाख रुपये म्हणून तगादा लावला जात होता. पत्नी गरोदर झाल्यानंतर विनाकारण जत येथील राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या एका खासगी रुग्णालयात तपासणी करण्यात आली. यावेळी संबंधित डॉक्टरने अभ्रक व्यवस्थित असल्याचे सांगितले. (Sangli)

दि. १३ डिसेंबर २०२१ रोजी विवाहतेचा पती, सासू, सासरे, दीर त्यांनी विवाहतेच्या जवळ जावून बळजबरीने पकडून तोंडात चार गोळ्या घातल्या व दोन तांब्या पाणी पाजले. तुला पूर्वीही दोन्ही मुली आहेत. तिसरी मुलगी नको असं म्हणून असा प्रकार केल्याचे त्यांनी सांगितलं व दोन तासानंतर रक्तस्राव होऊ लागला. याबाबत पतीला विचारणा करताच त्याने अर्ध्या तासात त्रास कमी होईल असे सांगितले. यामुळे पोटातील अभ्रकचा गर्भपात झाला आहे. या कारणास्तव संबंधित विवाहितेने पती, सासू ,सासरे, दीर यांच्याविरोधात उमदी पोलिसात तक्रार दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार करत आहेत. (Sangli)

हेही वाचलतं का?

Back to top button