सांगलीत दोन महिलांना 12 लाख रुपयांचा गंडा

सांगलीत दोन महिलांना 12 लाख रुपयांचा गंडा

Published on

सांगली, पुढारी वृत्तसेवा : क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक रकमेला 12 महिन्यांत चौपट परतावा देण्याचे आमिष दाखवून धनश्री कल्लाप्पा खोत (वय 42) व जयश्री जालिंदर दबडे (43, रा. शिवपॅराडाईज अपार्टमेंट, शंभरफुटी रस्ता, सांगली) या दोन महिलांना 12 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

निर्मला सूर्यकांत सांगावकर, प्रशांत तुकाराम पठाणे (लक्ष्मीनगर अपार्टमेंट, गणेशनगर, तिसरी गल्ली, सांगली), विशाल भीमराव कोरगांवकर (तळसंदे, ता. हातकणंगले), विक्रम व्यंकट मुळके व व्यंकट मुळके (दोघे रा. लातूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांना अजून अटक झालेली नाही.

संशयितांनी लक्ष्मीनगर अपार्टमेंटमध्ये पीएलयू अल्टीमा ही क्रीप्टो करन्सी कंपनी काढली होती. कंपनीच्या आभासी चलनामध्ये रक्कम गुंतवणूक केल्यास12 महिन्यात चौपट परतावा देण्याचे आमिष दाखविले. गतवर्षी मे मध्ये धनश्री खोत यांनी पाच लाख रुपये, तर व जयश्री दबडे यांनी सहा लाख 72 हजार चारशे रुपयांची रक्कम गुंतविली. रक्कम गुंतवूणक करून एक वर्षाचा कालावधी होऊन गेला तर संशयितांनी कोणताही परतावा दिला नाही. त्यामुळे या दोघींनी पैसे परत देण्याची मागणी केली. परंतु ते पैसे देण्यास टाळाटाळ करू लागले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जयश्री दबडे यांनी फिर्याद दाखल केली.

आणखी फसवणूक शक्य

संशयितांकडून आणखी काही जणांची फसवणूक झाली असण्याची शक्यता आहे. संबंधितांनी तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांनी केले. या प्रकरणातील फसवणुकीतील आकडा वाढल्यास हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news