सांगलीत 12 किलो गांजा जप्त

एकाला अटक; 3 लाख 35 हजारांचा मुद्देमाल हस्तगत
12 Kg Ganja seized In Sangli
सांगली : शहरात गांजा विक्रीसाठी आलेल्या एकास पोलिसांनी अटक करून गांजा, दुचाकी आणि मोबाईल जप्त केला.Sangli News
Published on
Updated on

सांगली : पुढारी वृत्तसेवा

शहरात गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला सांगली शहर पोलिसांनी अटक केली. यासीन शब्बीर मुजावर (वय 32, रा. साईनाथनगर, सांगली) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 12 किलो गांजा, दुचाकी आणि मोबाईल असा 3 लाख 35 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुजावर हा शहरातील कार्निवल हॉटेलजवळ गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती सांगली शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या नेतृत्वात पथक तयार करण्यात आले.

12 Kg Ganja seized In Sangli
Ganja Seized | पोलादपूर-धामणदेवी येथे कारमधून सात लाखांचा गांजा जप्त

मुजावर हा संबंधित ठिकाणी गांजा विक्रीसाठी आल्यानंतर छापा टाकून त्याला अटक करण्यात आली. यावेळी त्याच्याकडून 12 किलो 250 ग्रॅम वजनाचा 2 लाख 40 हजार 500 रुपये किमतीचा गांजा, 90 हजार रुपये किमतीची दुचाकी आणि पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, मुजावरने सांगलीमध्ये कोणास गांजा विक्रीसाठी आणला होता, याबाबत त्याच्याकडे कसून तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news