पोलादपूर : मुंबई गोवा महामार्गावरील पोलादपूर धामणदेवी जवळील हॉटेल अन्नपूर्णा येथे पांढर्या रंगाच्या मारुती ब्रिजामध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी आले असता पोलिसांनी केलेल्या कारवाईत ब्रिझा कारसह गाडीतील सुमारे सात लाखाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई बुधवारी उशिरा करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मुंबई गोवा महामार्ग वर बुधवारी सायंकाळी 7.15 वाजण्याच्या दरम्यान पोलादपूर नजीक अन्नपूर्णा हॉटेल जवळ पांढर्या रंगाचे मारुती ब्रीझा 24 बी एच 1593 उभी होती . आरोपी विक्की विजय गोस्वामी उर्फ छोट्या, रा. शाहूनगर, पाचगणी-जि सातारा याने पोलिसांची चाहूल लागताच गाडीची चावी घेत पलायन करण्याच प्रयत्न केला मात्र पोलीसांनी गाडी ताब्यात घेत गाडीची पाहणी केली. या गाडीत 22 किलो 435 ग्रॅमचा सुमारे 7 लाख 33 हजार 50 रुपये किंमतीचा हिरवट रंगाचा गांजा निळसर पांढर्या रंगाच्या गोणीत मध्ये आढळून आला. या प्रकरणी पोलसानी दोनपैकी 1 आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी अमली प्रदार्थासह 8 लाखाची कार असे 15 लाख 33 हजार 50 किमतीचे साहित्य जप्त केले आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण रायगड चे बाबासो पिंगळे अलिबाग यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार मंगेश मधुकर भिलारे, वय 27, रा. गुरेघर. ता महाबळेश्वर, जि. सातारा जिल्हा यास अटक करण्यात आली आहे.
या बाबत पोलादपूर पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनोव्यापारवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8 (क) 20 निहाय कारवाई करण्यात आली असून घटनास्थळी पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी भेट दिली. या प्रकरणी अधिक तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण चे पसोई नरे हे करीत आहेत.