मिरज : जुगार अड्ड्यावर तुफान मारामारी | पुढारी

मिरज : जुगार अड्ड्यावर तुफान मारामारी

मिरज, पुढारी वृत्तसेवा  शहरातील शहर बस स्थानकाजवळ सुरू असलेल्या तीन पाणी जुगार अड्ड्यावर तुफान हाणामारी झाली. यामध्ये दोघांवर कोयता, खुरपे, काठी या हत्याराने खुनी हल्ला करण्यात आला. यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले असून एकावर सांगली सिविल हॉस्पिटल एकावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

मिरज शहरातील स्टँड परिसरात असणारा एक तीन पानी जुगार अड्डा सध्या जोमात सुरू आहे. या अड्ड्यावर अनेक सांगली, मिरजेतील तरुण जुगार खेळण्यासाठी येत असतात. मंगळवारी सांगलीतील एक आणि मिरजेतील एक ते दोघे या ठिकाणी जुगार खेळण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांची शहरातीलच काही तरुणांसोबत जोरदार वादावादी झाली. त्यानंतर संबंधित तरुणांनी शहरातील ख्वाजा वसाहत येथील तरुणांना बोलावून दोघांवर कोयता, खुरपे, फायटर याने खुनी हल्ला केला. यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले असून अद्याप पोलीस ठाण्यात मात्र याबाबत नोंद करण्यात आली नव्हती.

  हे ही वाचलं का  

Back to top button