तासगाव-सांगली रस्त्यावर अपघात; नवविवाहिता ठार | पुढारी

तासगाव-सांगली रस्त्यावर अपघात; नवविवाहिता ठार

तासगाव ; पुढारी वृत्तसेवा : तासगाव-सांगली रस्त्यावर एका शीतगृहाजवळ दोन चारचाकी गाड्यांचा समोरासमोर अपघात झाला. त्यात दीपाली प्रमोद जाधव (रा.आळसंद, ता. कडेगाव) ही नवविवाहिता ठार झाली, तर 14 जण जखमी झाले. रविवारी दुपारी हा अपघात घडला.

रोहिणी विश्वजित मोहिते (वय 26), धनश्री अमोल मोहिते (वय 27), अर्चना रोहित मोहिते (वय 23, तिघीही रा. मांजर्डे, ता. तासगाव), सुनीता धनाजी माने (वय 45), शिवाय जकले (वय दीड वर्ष), सुनील माने (वय 43), धनाजी माने (वय 53), पद्मिनी माने (वय 70), राधिका माने (वय 35), शर्वरी माने (वय 10), श्रेया माने (वय 10), श्रीवर्धन माने (वय 30), शिवराज माने (वय 30) व सीमा माने (वय 30, सर्व रा. दानोळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) अशी या अपघातातील जखमींची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मांजर्डे येथील मोहिते कुटूंब सांगलीहून त्याच्या चार चाकीमधून (एम.एच. 10 डी.एल- 9601) मांजर्डेकडे निघाले होते. तर दानोळी येथील माने कुटूंबिय त्याच्या चारचाकी (एम.एच.09डी.ए-0304) ने खरसुंडी येथून देवदर्शन घेऊन तासगाव मार्गे दानोळीकडे निघाले होते.

दोन्ही चारचाकी गाड्यांची तासगाव- सांगली रस्त्यावरील एका शितगृहाजवळ समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही गाड्यातील सर्वजण जखमी झाले. जखमींना तातडीने प्रारंभी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.त्याच्यावर प्राथमिक उपचार करून सर्व जखमींना पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातातील गंभीर जखमी दीपाली यांचा वाटेतच मृत्यू झाला. अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.

नातेवाईकांना पाहून जाताना अपघात

दीपालीचा चार महिन्यांपूर्वी आळसंद येथील प्रमोद जाधव यांच्याशी विवाह झाला होता. प्रमोद हा रेल्वेत नोकरीस आहे. त्या माहेरील लोकांबरोबर सांगली येथील एका रुग्णालयात नातेवाईकांना बघण्यासाठी आल्या होत्या. जाताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.

Back to top button