मुंबई-पुणे महामार्गावर बस उलटून २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुंबई-पुणे महामार्गावर बस उलटून २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

खोपोली; पुढारी वृत्तसेवा :  जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळा घाटातील अंडा पॉईंटजवळ खासगी बस पलटी होऊन दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री आठ वाजता घडली. चेंबूरहुन लोणावळ्याला पिकनिकला गेलेले ४८ विद्यार्थी लक्झरी बस क्र. एमएच ०४- -जीपी २२०४ मधून परतत असताना हा अपघात घडला. यापैकी राज म्हात्रे, हितीका खन्ना या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

ही बस लोणावळा येथून चेंबूरच्या दिशेने जात होती. बसमध्ये चेंबूरच्या मयांक कोचिंग क्लासेसचे दहावीच्या वर्गातील
एकूण ४८ विद्यार्थी होते. त्यांच्यासोबत कोचिंग क्लासचे दोन शिक्षक देखील आहेत. जखमी विद्यार्थ्यांना लोणावळा, खोपोलीतील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर काही विद्यार्थ्यांना एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले. बस रस्त्याच्या बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली, अशी माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.. ड्रायव्हर चैनू ठाकूर याला पोलिसांनी ताब्यात घेत त्याची चौकशी केली. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती.

ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात

मयांक क्लासेसचे विद्यार्थी चेंबुरहून वेट अँड जॉय पार्कला पीकनिकसाठी सकाळी गेले. खंडाळा घाटात अंडा पॉइंटजवळ बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे भीषण अपघात झाला. १९ जण गंभीर जखमी असून ३५ जण किरकोळ जखमी आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news