चार वर्षांची पदवी जूनपासून ; अभ्यासक्रमाचा मात्र पत्ताच नाही !

चार वर्षांची पदवी जूनपासून ; अभ्यासक्रमाचा मात्र पत्ताच नाही !

रायगड; पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम जूनपासून सुरू करण्याचे राज्य शासनाने जाहीर केले आहे. मात्र, नव्या रचनेनुसार पदवीसाठीच्या अभ्यासक्रमाचा आराखडाही अद्याप तयार नसून, आता या अभ्यासक्रमासाठी युद्धपातळीवर काम करावे लागणार आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये उच्च शिक्षणात बदल करण्यात आले आहेत. प्रचलित तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आता चार वर्षांचा करण्यात आला आहे. तसेच मल्टिपल एंट्री, मल्टिपल एक्झिटचा पर्यायही विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार, चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम जूनपासून लागू करण्यासाठी सध्याचा अभ्यासक्रम बदलावा लागणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या अभ्यासक्रमात आणखी एका वर्षांची भर असे त्याचे स्वरूप नाही. धोरणात व्यक्त केलेल्या अपेक्षेनुसार उद्योगस्नेही, संशोधनाला चालना देणारा, रोजगारक्षम असलेला संपूर्ण नवा अभ्यासक्रम तयार होणे आवश्यक आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास जेमतेम पाच ते सहा महिने बाकी असताना अद्याप चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम तयार झालेला नाही.

राज्यातील विद्यापीठांच्या अधिकार | मंडळांच्या निवडणुकांची प्रक्रिया काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाली आहे. विद्यापीठांमध्ये अद्याप विद्या परिषद, अभ्यास मंडळे अस्तित्वात आलेली नाहीत. पदवी अभ्यासक्रम जूनपासून सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर काम करून अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news