Raigad Crime : उसने पैसे परत न दिल्याने महिलेची हत्या

पनवेलच्या कुंडेवहाळ गावातील घटना; आरोपी जेरबंद
Raigad Crime
उसने पैसे परत न दिल्याने महिलेची हत्या pudhari photo
Published on
Updated on

पनवेलः पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ गावात एका महिलेचा खून करून सोन्याचे दागिने घेऊन फरार झालेल्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांच्या महिला पथकाने जेरबंद केले आहे. उसने घेतलेले पैसे परत न केल्याने या महिलेचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

कुंडेवहाळ येथे महिलेचा गळा आवळुन खुन झाला असल्याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यास माहिती प्राप्त झाली होती. त्यावरुन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ सदर ठिकाणी जावुन खात्री केली. त्यावेळी संगिता नामदेव म्हात्रे (वय 55 कुंडेवहाळ) या मयत अवस्थेत आढळुन आल्या. तसेच सदर ठिकाणी केलेल्या चौकशीमध्ये मयत महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागीने हे चोरी झाले असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन महिलेचा मुलगा सवी नामदेव म्हात्रे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन यातील मयत महिलेचा कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी करण्याच्या उद्देशाने गळा दाबुन खून केला असल्याची फिर्याद नोंद करुन पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

Raigad Crime
Cyclone impact on fishermen : चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगडात 2,974 मच्छिमारी बोटी किनाऱ्यावर स्थिरावल्या

गुन्हयाच्या घटनास्थळी कोणतेही सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने आरोपीताबाबत माहिती मिळवणे अत्यंत अवघड जात होते. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशाने गुन्ह्याच्या तपासकामीं वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती. त्याप्रमाणे घटनास्थळ परिसरातील रहिवाश्यांकडे चौकशी करण्याची कामगिरी महिला सपोनि प्रज्ञा मुंढे, सपोनि सारिका झांझुणें, पोउपनि प्रियांका शिंदे व महिला अंमलदार, विशाल दुधे यांना देण्यात आली होती.

महिला पथकाने व विशाल दुधे यांनी अत्यंत कौशल्यपुर्ण परिसरातील सुमारे 30 महिला व पुरुष यांच्याकडे तपास केला. त्यामध्ये मोहंम्मद समीर अल्लाउद्दीन अन्सारी (वय 23 रा-कुंडेवहाळ) याच्याकडे केलेल्या तपासादरम्यान त्याने महिलेस 40 हजार रुपये उसने दिले होते. आरोपीने सदर रक्कम परत मिळणेकरीता मयत महिलेकडे वारंवार मागणी केली होती. तसेच दिलेली रक्कम परत मागण्याकरीता मयत महिलेच्या घरी गेला असता महिलेने पैसे परत करण्यासाठी नकार दिला. त्यामुळे आरोपीताने जाणीवपूर्वक महिलेचा गळा आवळून खून केला असल्याचे सांगितले. खुनाच्या गुन्हयातील आरोपीबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नसताना महिला पोलीस पथकाने सखोल तपास करुन, तांत्रीक तपासाच्या आधारे आरोपीताचे नांव निष्पन्न करुन, कौशल्यपुर्ण तपास करुन त्यास अटक उल्लेखणीय कामगिरी केलेली आहे.

Raigad Crime
Cyber Crime : सायबर ठगाकडून अबू सालेमच्या नावाचा वापर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news