वायनाड भूस्खलन | लष्कराचे बचावकार्य पाहून चिमुकला झाला भावूक, लिहिले हृदयस्पर्शी पत्र...

मी एक दिवस सैन्यात सामील होईन...
Wayanad Landslide Updates
वायनाड भूस्खलन | लष्कराचे बचावकार्य पाहून चिमुकला झाला भावूक, लिहिले हृदयस्पर्शी पत्र...File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : केरळच्या वायनाडमध्ये (Wayanad Landslide Updates) मुसळधार पावसानंतर झालेल्या भूस्खलनात मृतांची संख्या ३५८ वर पोहोचली आहे. दुर्घटनेला ६ दिवस उलटले असले, तरी अद्याप २०० हून जण बेपत्ता आहेत. भारतीय लष्कराचे बचाव कार्य अविरतपणे सुरुच आहे. दरम्यान लष्कराचे बचाव कार्य पाहून तिसरीच्या विद्यार्थ्याने भारतीय लष्कराला हृदयस्पर्शी पत्र लिहित म्हटले आहे, "प्रिय भारतीय सैन्य, मी एक दिवस सैन्यात सामील होवून देशासाठी कार्य करेन "

प्रिय भारतीय लष्कर

पुढे तो लिहतो, "मी नुकताच एक व्हिडिओ पाहिला ज्यामध्ये तुम्ही बिस्किटे खात आहात आणि तुमची भूक भागवत आहात आणि एक पूल बांधत आहात. त्या दृश्याने मला खूप प्रेरणा दिली आणि मी एक दिवस भातो पुढे म्हणाला. पुढे लिहतो, "प्रतिकूल परिस्थितीतही, तुमच्यामुळे आम्ही आशेचा किरण बनण्याचे ध्येय ठेवले आहे. तुमच्यासारखे वीर आम्हाला आमचे सर्वोत्कृष्ट देण्यास प्रेरित करतात. आम्ही आतुरतेने त्या दिवसाची वाट पाहत आहोत. तुमचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. तुमच्या धैर्यासाठी आणि प्रेरणासाठी धन्यवाद.

Wayanad Landslide Updates
वायनाड भूस्खलन : अडकलेल्यांना वाचविण्यासह मृतदेहांचा शोध सुरूच आहे.X (Twitter)

भारतीय लष्करानेही प्रत्युत्तर दिले, आम्ही आतुरतेने...

इयत्ता तिसरीचा विद्यार्थी रायनच्या पत्राला भारतीय लष्करानेही उत्तर दिले आहे. लष्कराने रायनच्या पत्राबद्दल आभार मानले आहे. भारतीय लष्कराने रायनला दिलेल्या उत्तरात म्हटवे आहे की, "तुमचे हृदयस्पर्शी शब्द आम्हाला खूप भावले आहेत. संकटकाळात आशेचा किरण बनणे हे आमचे ध्येय आहे आणि तुमचे पत्र या मिशनची खात्री देते. तुमच्यासारखे नायक आम्हाला आमचे सर्वोत्तम देण्यासाठी प्रेरणा देतात. तुम्ही गणवेश परिधान करून आमच्या पाठीशी उभे राहाल त्या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. आपण मिळून आपल्या देशाचा अभिमान वाढवू

Wayanad Landslides
वायनाड भूस्खलनातील मृतांची संख्या ३५८ वरfile photo

एनएसएस १५०, तर काँग्रेस १०० घरे बांधणार

वायनाड दुर्घटनेतील (Wayanad Landslide Updates) घरे मातीखाली गेलेल्या लोकांना राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे १५० घरे बांधून देण्यात येणार आहेत, असे केरळच्या उच्चशिक्षणमंत्री आर. बिंदू यांनी सांगितले. त्याचबरोबर काँग्रेसतर्फे पीडितांसाठी १०० घरे बांधून देण्यात येतील, असे काँग्रेसचे नेते तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जाहीर केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news