

नेरळ : नेरळ ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या नळपाणी योजनेचे काम सुरू आहे. त्यामुळे गावात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असतानादेखील पाण्याची चोरी सुरू आहे. दरम्यान, याबद्दल नेरळ ग्रामपंचायतकिडून ज्या दोन ठिकाणी व्हॉल्व खोलून पाण्याची चोरी केली जाते. त्या ठिकाणी लोखंडी लॉक लावण्याचे आणि टेहळणी ठेवण्याचे आदेश ग्रामपंचायतीचे प्रशासक यांनी कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
नेरळ गावासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून नळपाणी योजना १९९८ मध्ये बनविण्यात आली होती. ही योजना नेरळ वातील ३६ हजार लोकसंख्येसाठी होती आणि त्या योजनेची मुदत २०१६ मध्ये संपली. त्या योजनेची मुदत संपून आठ वर्षाचा काळ लोटला असून नेरळ ग्रामपंचायत हद्दीमध्ये राहणाऱ्या परिसरात लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे नळपाणी योजना अपुरी पडत आहे. ते लक्षात घेवून जीवन प्राधिकरणकडून नवीन नळपाणी योजना मंजूर असून त्या योजनेचे काम सुरू आहे. नवीन नळपाणी योजनेचे काम करण्यासाठी मोहाची वाडी येथील एक जलकुंभ तोडण्यात आले आहे. त्यावेळेपासून नेरळ गावात कमी दाबाने पाण्याचा पुरवठा होत आहे.
नेरळ ग्रामपंचायतीमधील सर्व भागाला मोहाची वाडी येथे टेकडीवर असलेल्या जलकुंभामधून पाणी वितरित केले जाते. त्याटाकीतून पाणी सोडण्याचे नियोजन सकाळी सहा पासून सुरू होते आणि सायंकाळीपर्यंत पाणी सोडले जाते. कमी दाबाने पाणी आल्यावर त्या पाण्याची चोरी ही इले क्ट्रिक मोटार यांचा वापर करून केली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नेरळ ग्रामपंचायत पाणी पुरवठा विभाग जलशुध्दीकरण केंद्रात शुद्ध केलेले पाणी मोहाची वाडी येथे पाठवण्याचे काम करते. जेणेकरून दसऱ्या दिवशी सकाळी सर्व भागाला पाणी वितरित करणे सोपे जावे, यासाठी पाणीपुरवठा विभाग सतर्क असतो. मात्र प्रशासकीय राजवटीत नेरळ ग्रामपंचायतीमधील कर्मचारी वर्ग आणखी सतर्क झाला असून पाणी पुरवठा बंद झाल्यावर देखील हे कर्मचारी रात्री सर्व व्हॉल्व तपासात असतात. नेरळमधील काही रहिवाशी हे पाण्याचे व्हॉल्व रात्रीच्या अंधारात सोडून आपल्या भागाला अधिकचे पाणी ओतून घेत असल्याची बाब कर्मचारी वर्गाच्यालक्षात आली आहे. त्यामुळे पाणी कर्मचारी यांनी ही बाब प्रशासक सुजित धनगर आणि ग्रामविकास अधिकारी अरुण कार्ले यांच्या कानावर घातली आहे.
पाणी पुरवठा वितरित करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जकात नाका आणि तुलसी समोर असलेले पाण्याचे व्हॉल्व हे सोडून पाण्याची चोरी करीत आहेत. या दोन्ही व्हॉल्ववर चिंच आळी, मोडक नगर, तुलसी आणि बुन्हाणी पार्क या भागातील किमान ३० इमारती असून स्थानिकांची २०० हून अधिक घरे आहेत, या भागातील रहिवाशांना दिवसातून दोनवेळा पाणी मिळत असल्याचे आढळून आले आहे. रात्री अंधारात पाण्याचे व्हॉल्व उघडून पाणी चोरी सुरू असून त्याचा परिणाम पाण्याची मुख्य टाकी खाली होण्यावर होत आहे. त्यामुळे नेरळ पाण्याची चोरी रोखावी अशी मागणी होत आहेपाणी पुरवठा वितरित करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जकात नाका आणि तुलसी समोर असलेले पाण्याचे व्हॉल्व हे सोडून पाण्याची चोरी करीत आहेत. या दोन्ही व्हॉल्ववर चिंच आळी, मोडक नगर, तुलसी आणि बुन्हाणी पार्क या भागातील किमान ३० इमारती असून स्थानिकांची २०० हून अधिक घरे आहेत, या भागातील रहिवाशांना दिवसातून दोनवेळा पाणी मिळत असल्याचे आढळून आले आहे. रात्री अंधारात पाण्याचे व्हॉल्व उघडून पाणी चोरी सुरू असून त्याचा परिणाम पाण्याची मुख्य टाकी खाली होण्यावर होत आहे. त्यामुळे नेरळ पाण्याची चोरी रोखावी अशी मागणी होत आहे.