

धनराज गोपाळ
पोलादपूर: मुंबई गोवा महामार्गावरील ग्रामीण रुग्णालय पोलादपूर समोर दुचाकी स्वार वार्डबॉय तरुण यास कारची पाठीमागून ठोकर लागून वार्ड बॉय तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली आहे.
याबाबत सविस्तर हकीगत अशी की वार्डबॉय करून किरण गौतम बाविस्कर वय २२ हा आपल्या ताब्यातील एक्टिवा घेऊन महामार्गावरून पोलादपूर दिशेने कामानिमित्त जात असताना त्याचदरम्यान पाठीमागून मुंबई बाजू कडून महाबळेश्वर कडे जाणारी महिंद्रा मरांझो कार चालक हर्ष दिनेश कुमार पटेल वय २१ यांनी अति वेगाने कार चालून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून समोरच्या दुचाकी ला पाठीमागून ठोकर मारून अपघात केला.
या अपघातात दूचाकी स्वार वार्ड बॉय तरुण याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी महाड येथे पाठवण्यात आले आहे.
या घटनेची माहिती समजतात पोलादपूर पोलीस व कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर ढाकणे पोलीस हवलदार राजन माजलकर, कृष्णा चौधरी आदींनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला आहे. या घटनेची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलादपूर पोलीस करीत आहेत.
दरम्यान पोलादपूर ग्रामीण रुग्णालयासमोर वारंवार अपघाताची मालिका सुरूच असून रुग्णालयासमोर महामार्गावर रुग्णवाहिका जाण्या येण्यासाठी महामार्ग प्रशासनाकडून कट रस्ता ठेवण्यात आला आहे मात्र या ठिकाणी रस्ता ओलांडताना मोठा खड्डा पडल्याने अपघात होण्याच्या घटना वाढल्या आहेत याकडे महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांत केला जात आहे. महामार्ग प्रशासन अजून किती बळी घेणार असा संतप्त सवाल येथील स्थानिक जनता विचारत आहे.
याच ठिकाणी गेल्या वर्षी एका लक्झरी बस मधून उतरणारा प्रवासी आणि पाठीमागून एका कंटेनर ने दिलेली धडक यात प्रवाशाला जीव गमावा लागला मात्र महामार्ग प्रशासन याकडे दुर्लक्ष का करते असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
महामार्ग प्रशासनाने रुग्णालया समोरील रुग्णवाहिका जाण्या येण्यासाठी ठेवलेला रस्ता बंद तरी करावा नाहीतर उपाययोजना करून मार्ग काढावा अन्यथा एखादी मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.