Mahad ST depot revenue: महाड आगाराच्या लालपरीला बसतोय आर्थिक फटका; 13 लाखांचे उत्पन्न 11 लाखांवर

अपुरा कर्मचारीवर्ग, प्रवाशांच्या अभावाने होतोय तोटा
Mahad ST depot revenue
Mahad ST depot revenuePudhari
Published on
Updated on

महाड: कोकणाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणाऱ्या महाड एसटी आगारातील कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांबरोबरच प्रवासी वर्गाने देखील गेल्या काही महिन्यात मंडळाच्या सेवेकडे पाठ फिरवल्याने प्रतिदिनी 13 लक्ष रुपये असलेले उत्पन्न 11 लक्ष रुपये पर्यंत खाली आल्याची माहिती महाड आगारातील सूत्रांकडून देण्यात आली आहे.

या संदर्भात प्राप्त झालेल्या माहितीनुसार महाड एसटी आगारात मागील वर्षी चालक वाहकांच्या संख्येत भरती करण्यात आली असली तरीही कार्यशाळा व लिपिक पदांच्या सुमारे 60 पेक्षा जागा रिक्त असल्याचे सांगण्यात आले आहे.

Mahad ST depot revenue
Raigad Fort: किल्ले रायगडाचे गतवैभव पुन्हा प्रस्थापित होणार

कार्यशाळेतील कामगारांची संख्या कमी झाल्याने येथील दुरुस्तीच्या कामावर देखील प्रभाव पडल्याचे निदर्शनास आले असून यामुळे गाड्यांच्या दुरुस्तीमध्ये विलंब होत असल्याचे सांगण्यात येते.

मागील पाच ते सहा वर्षांपासून नवीन एसटी आगाराच्या इमारतीचे काम देखील निधी अभावी रखडले होते मात्र मागील काही महिन्यात त्या ठिकाणी पुन्हा कामाला सुरुवात झाल्याचे प्रत्यक्ष भेटी अंतिम निदर्शनास आले आहे मात्र या आगाराचे काम पूर्ण होऊन ते हस्तांतरित होण्यास अजून किमान सहा ते सात महिन्यांचा कालावधी लागेल अशी माहिती प्राप्त झाली आहे.

Mahad ST depot revenue
Political News: माजी सभापती महादेव पाटील यांचा राष्ट्रवादीला रामराम? राष्ट्रवादीचा बडा मासा शिवसेनेच्या गळाला?

पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या असलेल्या आगारातील चालक वाहकांची इमारत ही नादुरुस्त स्थितीत असल्याने नवीन इमारतीमध्ये त्यांना तातडीने राहण्याकरिता व्यवस्था करावी अशी मागणी चालक वाहक वर्गातून करण्यात येत आहे.

महाड एसटी आगारातील उपहारगृह मागील दहा वर्षापासून बंद असल्याने येथे रात्री येणाऱ्या प्रवासी वर्गाला तसेच चालक वाहकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

एकूणच प्रवाशांच्या सेवेसाठी म्हणून कार्यरत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून कोकणातील मुख्य आगार म्हणून परिचित असलेल्या महाड कडील या बहुविध समस्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षाबद्दल प्रवासी वर्गातून तीव्र नाराजी युक्त संताप व्यक्त होत आहे.

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रिक्त असलेल्या सर्व पदांची तातडीने भरती करावी व नवीन इमारतीमध्ये चालक वाहकांना सुरक्षितपणे राहण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news