Waghjai Devi Kumbhale : भाविकांच्या नवसाला पावणारी कुंभळे गावची वाघजाई देवी
तळा : तळा तालुक्यातील निसर्गरम्य अशा डोंगराळ भागातील कुंभळे गाव हे नवसाला पावणार्या वाघजाई मंदिरामुळे नावारूपाला येत आहे. डोंगराळ भागात असणार्या कुंभळे गावचे तळ्यापासूनचे अंतर अंदाजे 15 की.मी आहे. सुरूवातीला या गावातील वाघजाई मंदिर हे देवीचे जागृत स्थान व मोठं मोठी अंदाजे 15 ते 20 फूट उंच उंच वारूळे पूर्ण देवीच्या मंदिरात होती. या मंदिराचे मे 2021 मध्ये जिर्णोद्धार झाले असून त्या मंदिराचे चांगले बांधकाम झाले आहे. या मंदिरात ग्रामस्थ मोठ्या भक्तिभावाने पूर्वपरंपरेपासून पारंपारिक पध्दतीने नवरात्र उत्सव दरवर्षी मोठ्याप्रमाणात साजरा करतात. आजही मंदिरातील मोठमोठी वारूळे आहेत ती अंदाजे 6 ते 7 फूट उंच आहेत.
या मंदिर परिसरात प्रवेश केले की निसर्गरम्य व आनंदीवातावरणात मन प्रसन्न होऊन मंदिरात मनाला शांतता लाभून मनातील मनोकामना पूर्ण होते अशी वाघजाई माता आहे. येथील वयोवृध्दांशी व गावचे अध्यक्ष सुरेश देवकर, रामचंद्र राणे, हरिश्चंद्र देवकर, सुनिल देवकर,देवीचे पूजारी सुरेश देवकर, निमेश देवकर, प्रकाश देवकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की गावाला अथवा गावातील कोणत्याही व्यक्तीला अडीअडचणी आल्या तर देवीजवळ गा-हाराणे वाघजाई गावदेवीजवळ मांडले जाते त्यावेळी ती देवी सोडवीते. आपली मनोकामना ठेवली की ती पूर्ण होते. नवरात्र उत्सव तर मोठ्या उत्साहात साजरा केला जातोच परंतु नेहमीच देवीची भक्तीभावाने परंपरेनुसार पुजा केली जाते.
ग्रामस्थ देवीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करत असतात. होळी उत्सवातही मोठ्याप्रमाणात देवीचा उत्सव साजरा केला जातो.यावेळी सर्व ग्रामस्थ सर्व सहभागी होतात. दर सोमवार व शनिवारी भक्ती भावाने आरती केली जाते.

