

उरण : भारतातील रेल्वे मालवाहतुकीला मोठी गती देण्यासाठी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी सज्ज झाले आहेत. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या वैतरणा-जेएनपीटी विभागाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक मुंबईत पार पडली.
डीएफसीसीआयएलचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण कुमार यांनी जेएनपीटीचे अध्यक्ष गौरव दयाल आणि उपाध्यक्ष रवीश कुमार सिंग यांची भेट घेऊन प्रकल्पाच्या सद्यस्थितीची माहिती दिली. या बैठकीत प्रामुख्याने खालील विषयांवर भर देण्यात आला.
या बैठकीला डीएफसीसीआयएलचे संचालक अनुराग शर्मा, कार्यकारी संचालक मनीष कुमार अवस्थी, संदेश श्रीवास्तव, मुख्य महाव्यवस्थापक (मुंबई) विकास कुमार आणि जेजीएम अरविंद नगर उपस्थित होते. याप्रसंगी प्रवीण कुमार यांनी जेएनपीटी अध्यक्षांना डीएफसीसीआयएलच्या प्रवासावर आधारित कॉफी टेबल बुक भेट दिले.
वैतरणा-जेएनपीटी लिंक कार्यान्वित झाल्यामुळे देशातील सर्वात व्यस्त अशा जेएनपीटी बंदरातून होणारी मालवाहतूक अधिक विश्वासार्ह आणि वेगवान होणार आहे. यामुळे वाहतूक खर्च कमी होऊन उद्योगांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जेएनपीटी बंदर आणि फ्रेट कॉरिडॉर यांच्यात थेट संपर्क प्रस्थापित करणे. वेळेची बचत: एक्झिम (आयात-निर्यात) मालाची वाहतूक जलद आणि अधिक कार्यक्षमतेने करणे. लॉजिस्टिक्समध्ये क्रांती: रेल्वेवर आधारित मालवाहतूक वाढवून रस्त्यावरील ताण कमी करणे आदी प्रकल्प यामुळे मार्गी लागणारआहेत.
हा कॉरिडॉर पूर्ण झाल्यामुळे मालवाहतुकीच्या क्षेत्रात मॉडेल शिफ्ट (रस्त्याकडून रेल्वेकडे स्थलांतर) पाहायला मिळेल. यामुळे शाश्वत लॉजिस्टिक्सला चालना मिळेल आणि भारताच्या विदेशी व्यापाराची स्पर्धात्मकता वाढेल.
गौरव दयाल, जेएनपीटीचे अध्यक्ष