Uran traffic jam : उरणमध्ये वाहतूककोंडीविरोधात शिवसेना आक्रमक

वरिष्ठ अधिकाऱ्यांना बैठकीत धारेवर धरताच, महिनाभरात रस्ते, पूल दुरुस्तीचे प्रशासनाचे लेखी आश्वासन
Uran traffic jam
Uran traffic jampudhari photo
Published on
Updated on

उरण : उरण पूर्व भागात गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या भीषण आणि प्राणघातक वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जेएनपीटी, सिडको, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना थेट धारेवरले असता, येत्या महिनाभरात रस्ते आणि पूल दुरुस्तीचे प्रशासनाचे लेखी आश्वासन दिले आहे.

शिवसेनेचे उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर व पंचायत समिती सदस्या कविता रूपेश पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर करळ येथील वाहतूक नियंत्रण कार्यालयात विविध शासकीय प्राधिकरणांची आज महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत अनधिकृत पार्किंगवर कारवाई करण्याचामुद्दा कळीचा ठरला सीएफएस आणि कंटेनर यार्ड्सच्या वाहनांमुळे होणाऱ्या बेकायदेशीर पार्किंगवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. सर्व सीएफएस आणि कंटेनर यार्ड्सनी स्वतःची हक्काची पार्किंग व्यवस्था उभी करण्याचे निर्देश देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

Uran traffic jam
MMRDA bridge Thane : कासारवडवली-खारबाव पुलासाठी ३३९ वृक्षतोडीचा घाट

खोपटा पुलाच्या कामातील अवाजवी विलंब आणि खोपटा-कोप्रोली मार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे उरणकरांना होणाऱ्या त्रासावर या बैठकीत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. शिवसेने शिष्टमंडळातील सदस्यांनी मांडलेल्या समस्यांेनंतर प्रशासनाने नमते घेत महिनाभरात दुरुस्ती काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता डी. एम. पाटील यांनी येत्या महिनाभरात खोपटा पूल दुरुस्त करून वाहतुकीसाठी खुला करण्याचे आणि रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवण्याचे लेखी आश्वासन यावेळी दिले. तसेच वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या कंपन्यांना नोटिसा बजावून कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

या संयुक्त बैठकीला जेएनपीएचे उपमहाप्रबंधक श्रीकांत कुलकर्णी, प्रेमचंद पाटील, सिडकोचे धनंजय पाटील, एमएमआरडीएचे अनुराग कोलते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे डी. एम. पाटील, वाहतूक पोलीस निरीक्षक संजय पाटील व अतुल दहिफळे उपस्थित होते.शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, जिल्हा परिषद सदस्या प्रेरणा पाटील, पंचायत समिती सदस्य कविता पाटील, दीपक भोईर, रूपेश पाटील, भूषण ठाकूर, सुजाता पाटील, चिरनेरचे सरपंच भास्कर मोकल, पागोटेचे सरपंच कुणाल पाटील यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Uran traffic jam
Gutkha ban Maharashtra: मुंबईच्या कचर्‍यात खाऊन टाकलेल्या गुटख्याच्या पुड्या येतात कशा?

दुरुस्ती काम पूर्ण करण्याचे आश्वासन

खोपटा पुलाच्या कामातील अवाजवी विलंब आणि खोपटा-कोप्रोली मार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे उरणकरांना होणाऱ्या त्रासावर या बैठकीत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. शिवसेने शिष्टमंडळातील सदस्यांनी मांडलेल्या समस्यांेनंतर प्रशासनाने नमते घेत महिनाभरात दुरुस्ती काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news