

कोप्रोली उरण: उरण शिवडी-न्हावा सागरी सेतू सुरू झाल्याने उरण, पनवेल, पेण तालुक्यातील भात शेतीवर भाजपा महायुती सरकारचा डोळा आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परदेशातील भांडवलदारांबरोबर करार केला आहे; परंतु तिसऱ्या मुंबईसाठी एक इंचही जमीन सरकारला देणार नाही, असा निर्धार उरण तालुक्यातील शेतकऱ्यांनी माजी न्यायमुर्ती बी जी कोळसे- पाटील यांच्या नेतृत्वाखाली व्यक्त केला आहे.
देशाच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कोकण भवन येथील एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली आहे. यावेळी हजारोंच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले.
एमआयडीसी, रेल्वे,नवी मुंबई विमानतळ, सिडको, सागरी सेतू, नवीन शहरे अशा विविध प्रकल्पांसाठी जमिनी ताब्यात घेणाऱ्या सरकारकडून उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील आगरी, कोळी, कराडी समाजाला नष्ट करण्याचा प्रयत्न हा तिसऱ्या मुंबईच्या माध्यमातून सुरू केला आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आपला विरोध दर्शवून सदर प्रकल्पासाठी आपल्या हरकती नोंदविल्या आहेत. तरी ही हे सरकार सदर शेतकऱ्यांकडून हुकूमशाही पद्धतीने जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांनी माजी न्यायमुर्ती बी जी कोळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावरील आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
असे असतानाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परदेशातील भांडवलदारांबरोबर तिसऱ्या मुंबईच्या उभारणीसाठी करार केला आहे; परंतु तिसऱ्या मुंबईसाठी एक इंचही जमीन सरकारला देणार नाही, असा निर्धार उरण तालुक्यातील शेतकऱ्यांनी माजी न्यायमुर्ती बी जी कोळसे- पाटील यांच्या नेतृत्वाखाली व्यक्त केला असून आज देशाच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कोकण भवन येथील एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली आहे.
यावेळी ऐतिहासिक प्रसिद्ध चिरनेर गावात हजारोंच्या संख्येने शेतकरी जमा होऊन नाही ना कदापी नाही आमच्या जमिनी देणार नाही असा निर्धार व्यक्त करत कोकण भवन येथील एक दिवसीय लाक्षणिक उपोषण स्थळी सहभागी होत असल्याचे दिसून येत होते.
कोकण भवन येथील एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला माजी आमदार मनोहर शेठ भोईर, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख संतोष ठाकूर, मनसेचे तालुकाध्यक्ष अँड सत्यवान भगत, एमएमआरडीए भूसंपादन विरोधी समितीचे समन्वयक रूपेश पाटील, सारडे ग्रामविकास समितीचे अध्यक्ष मनोज पाटील, कृष्णा पाटील सामाजिक कार्यकर्ते पिरकोन. काँग्रेसचे विनोद म्हात्रे, तालुका संघटक बी एन डाकी, कमलाकर पाटील, कविता रुपेश पाटील,प्रसाद फो्पेरकर सामाजिक कार्यकर्ते चिरनेर कैलास म्हात्रे, महेंद्र ठाकूर,चंद्रशेखर ठाकूर आदी मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले.