Uran Panvel Road Issue: उरण-पनवेल मुख्य रोड मृत्यूचा सापळा

तेलीपाडा आणि नवीन शेवा येथील गतिरोधकांबाजूला रवड्डे; अपघाताची शक्यता
Road Pothole
Road PotholePudhari File Photo
Published on
Updated on

जेएनपीए: उरण-पनवेल या मुख्य रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी तेलीपाडा आणि नवीन शेवा गावच्या हद्दीतील गतिरोधक गेल्या कित्येक महिन्यांपासून अत्यंत धोकादायक बनले आहेत. या मुख्य रस्त्यावरील गतिरोधकांना लागूनच मोठे खड्डे पडले असून, विशेषतः तेलीपाडा येथील एका गतिरोधकाच्या बाजूला पाइपलाइन टाकताना खोदलेला मोठे चर कंत्राटदाराने तसेच ठेवून दिले आहेत.

हे खट्टे आणि चर चुकवण्याच्या नादात समारून येणाऱ्या वाहनांशी थेट धडक होऊन मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अवघ्या चार दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला असून, त्यापूर्वी रस्ता दुरुस्त न झाल्यास येथे गंभीर दुर्घटना घडूशकते, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Road Pothole
Uran Accident News: उरणमध्ये दोन दुचाकींची धडक; दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू

उरण तालुक्यातील तेलीपाडा येथील एका गतिरोधकाच्या बाजूने उकरलेला रस्ता आणि तो चर योग्य रीतीने न बुजवल्यामुळे तो तशाच धोकादायक स्थितीत राहिला आहे, तर मुख्य रस्त्यावरील इतर गतिरोधकांच्या बाजूला खड्डे पडले आहेत.

वेग मर्यादित करण्यासाठी असलेल्या गतिरोधकांवरच गाड्या आदळत असल्याने आणि ते वाचवताना अपघात होण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे. उरण रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजू अजूनही प्रवाशांसाठी पूर्ण क्षमतेने खुल्या झालेल्या नाहीत.

Road Pothole
MBA MMS CET Result 2026: एमबीए-एमएमएस सीईटी निकाल जाहीर; 8 विद्यार्थ्यांनी मिळविले 100 पर्सेंटाईल

त्यामुळे तेलीपाडा, करंजा, चाणजे आणि नवीन शेवा परिसरातील शेकडो प्रवाशांना लोकल ट्रेन पकडण्यासाठी उरण बाजारपेठेतून जाण्याऐवजी द्रोणागिरी स्टेशन गाठावे लागते. द्रोणागिरी स्टेशनवर यायचे असल्याने नागरिक याच उरण पनवेल मुख्य रस्त्याचा मार्ग निवडतात. सकाळी आणि संध्याकाळी ट्रेन पकडण्याच्या घाईत असणारे नोकरदार आणि वाहन चालक या मुख्य रस्त्यावरील खोदलेल्या चरांमुळे आणि खड्ड्यांमुळे त्रस्त झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news