Uran Online Gaming: उरणमध्ये ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली जुगाराचे पेव; तरुण पिढी उद्ध्वस्त

नागरिकांकडून संताप; कारवाईची मागणी
Uran Online Gaming
Uran Online GamingPudhari
Published on
Updated on

​कोप्रोली-उरण: औद्योगिक आणि बंदरांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उरण तालुक्याला सध्या एका वेगळ्याच अनिष्ट प्रवृत्तीने विळखा घातला आहे. तालुक्याच्या ग्रामीण तसेच शहरी भागात बेकायदेशीर जुगार, मटका आणि ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली चालणाऱ्या जुगाराचे पेव फुटले आहे.

यात उरणमधील तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त होत चालली आहे. स्थानिक प्रशासनाच्या कथित सुस्त कारभारामुळे जुगार चालवणाऱ्यांचे धाडस कमालीचे वाढले असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

Uran Online Gaming
Water Scarcity Crisis: रायगडातील धरणांनी गाठला तळ; ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा तीव्र

अवैध धंदे जोरात ​मिळालेल्या माहितीनुसार, उरण शहर, करंजा, चाणजे, बोरी, खोपटा कोप्रोली रोड , करंजा रोड, कोप्रोली सारडे रोड आणि जेएनपीए परिसरातील अनेक ढाबे, पानटपऱ्या आणि आडबाजूच्या घरांमध्ये दररोज लाखो रुपयांची उलाढाल असणारे जुगाराचे अड्डे सुरू आहेत.

'कल्याण मटका', 'वरळी मटका' यांसारख्या पारंपरिक जुगारासोबतच, आता मोबाईलवरील बेकायदेशीर ऑनलाईन जुगारही जोमाने सुरू आहे. कमी वेळात जास्त पैसे कमावण्याच्या मोहापायी अनेक कष्टकरी, कामगार आणि महाविद्यालयीन तरुण या चक्रव्यूहात अडकत चालले आहेत.

​जुगाराच्या या व्यसनामुळे उरणमधील अनेक मध्यमवर्गीय आणि गरिबांचे संसार उघड्यावर आले आहेत. घरा घरातील शांतता भंग पावली असून, घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

Uran Online Gaming
Roha Fertilizer Scam: खरिपाच्या तोंडावर रोह्यात खतांचा काळाबाजार

दिवसभर कष्ट करून आलेला पैसा पुरुष जुगाराच्या अडड्यावर उडवून येतात. घरात खायाला अन्न नाही आणि मुलांच्या शिक्षणाची फी भरायला पैसे नाहीत. प्रशासनाने हे अड्डे त्वरित बंद केले पाहिजेत, नाहीतर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल."

​जुगारासाठी लागणारे पैसे गोळा करण्यासाठी तरुणांकडून चोऱ्या, पाकीटमारी आणि अमली पदार्थांची विक्री यांसारखे गुन्हे घडत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.

​उरण तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर जुगाराचे अड्डे सुरू असताना, स्थानिक प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे. ​

सराईत जुगार चालवणाऱ्यांवर तडीपारी किंवा मोक्कासारखी कडक कारवाई करण्यात यावी अशी उरणमधील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news