Rupali Kasat case: रुपाली कासट मृत्यू प्रकरण; आत्महत्या की हत्या?

वाणगाव येथे 30 मे रोजी रुपाली गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.
Rupali Kasat case
Rupali Kasat casefile photo
Published on
Updated on

कासा: डहाणू तालुक्यातील धामटणे येथील 24 वर्षीय रुपाली सुरेश कासट हिच्या संशयास्पद मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. वाणगाव येथे 30 मे रोजी रुपाली गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.

या प्रकरणी वाणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असली, तरी हा आत्महत्येचा प्रकार नसून हत्या असू शकते, असा गंभीर आरोप व संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष, सखोल व उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Rupali Kasat case
Vandri Dam Water Issue: वांद्री धरणाच्या पाण्याला वाढती मागणी

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रुपाली कासट (24) ही मूळची धामटणे (ता. डहाणू) येथील रहिवासी होती. ती 2024 पासून वाणगाव पश्चिम येथील एका सुशिक्षित व नोकरदार दाम्पत्याकडे केअरटेकर म्हणून कार्यरत होती.

संबंधित महिला एका आश्रमशाळेत कार्यरत असल्याचे सांगितले जाते, तर त्यांचे पती एका खासगी कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. मृत रुपालीच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांनुसार, संबंधित महिलेचे त्याच शाळेतील एका सहकारी व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. हा व्यक्ती वारंवार त्यांच्या घरी येत असे.

या संबंधांची माहिती संबंधित महिलेच्या पतीला मिळाल्यानंतर पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, या वादांचे खापर रुपालीवर फोडण्यात आले. “तूच आमच्या संबंधांबाबत माहिती दिलीस” असा आरोप संबंधित महिला रुपालीवर करत होती.

तसेच संबंधित व्यक्तीकडूनही रुपालीला धमकावले जात असल्याची माहिती तिने आपल्या कुटुंबीयांना दिली होती. उन्हाळी सुट्ट्यांदरम्यान रुपाली दोन ते तीन वेळा आपल्या गावी आली होती. 23 मे रोजी ती धामटणे येथे आली होती.

Rupali Kasat case
Dahanu Accident: डहाणूत कार अपघातात पाच जखमी; अचानक गुरे आल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले

मात्र संबंधित व्यक्ती कंपनीच्या कामानिमित्त बाहेर जाणार असल्याचे सांगून तिला वारंवार फोन करून कामावर परत येण्यास सांगत होते. आर्थिक परिस्थिती आणि पूर्वी मिळालेल्या मदतीची जाणीव ठेवून रुपाली 26 मे रोजी पुन्हा वाणगाव येथे गेली होती.

30 मे रोजी सकाळी रुपालीच्या कुटुंबीयांना फोनद्वारे तिच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. रुपाली राहत असलेल्या घरालगतच्या गॅलरीच्या स्लॅबला साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे सांगण्यात आले. मात्र घटनास्थळी पोहोचल्यानंतर परिस्थिती संशयास्पद वाटल्याने हा प्रकार आत्महत्या नसून हत्या असू शकते, असा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

रुपालीचे वडील सुरेश कासट यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात संबधीत तिघांविरोधात संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी त्यांच्या जबाबाची नोंद घेतली असून विविध अंगांनी तपास सुरू आहे. रुपालीच्या मृत्यूमागील सत्य बाहेर यावे, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

मानसिक तणावाखाली असल्याचा दावा

रुपाली ही शांत, मनमिळाऊ आणि जबाबदार स्वभावाची होती. ती घरातील मुलांचा सांभाळ, शाळेशी संबंधित कामे आणि घरगुती जबाबदाऱ्या सांभाळत होती. संबंधित कुटुंबाचा तिच्यावर विश्वास होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून संबंधित महिलेचे रुपालीबाबतचे वर्तन बदलले होते आणि ती मानसिक तणावाखाली असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news