Raigad Workers Protest : उरणमध्ये १११ कामगारांवर उपासमारीची वेळ

सॅम सर्वेअर्स ॲन्‍ड ऍडजेस्टर्स कंपनीच्या कामगारांचे चार महिन्यांपासून वेतन रोखले; कंपनीसमोर कामबंद आंदोलन
Raigad Workers Protest
Raigad Workers Protestpudhari photo
Published on: 
Updated on: 

जेएनपीए : विठ्ठल ममताबादे

सॅम सर्वेअर्स ऍण्ड ऍडजेस्टर्स या कंत्राटदारामार्फत डी.आर.टी.ए सी.एफ.एस, कॉनकोर, द्रोणागिरी, पागोटे उरण येथे कार्यरत असलेल्या १११ कामगारांचे मागील चार महिन्यांचे वेतन कपात केल्याबद्दल पूर्ण सी.एफ.एस.चे काम १११ कर्मचाऱ्यांनी बंद केले आहे. सतत होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ व मागण्यांच्या पूर्ततेसाठी रायगड श्रमिक संघटनेच्या माध्यमातून व कॉम्रेड तथा कामगार नेते भूषण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांनी कंपनीच्या गेट समोरच आंदोलन सुरु केले आहे.

रायगड श्रमिक संघटना अंतर्गत डी. आर.टी.ए. सी.एफ.एस, कॉनकोर, द्रोणागिरी, पागोटे येथील कामकाजामध्ये सॅम सर्वेअर्स ऍण्ड ऍडजेस्टर्स या कंपनीच्या कंत्राटाअंतर्गत लेबर, सुपरवायजर व सर्वेअर्स अशा पदांवार कार्यरत असलेले एकून १११ कामगार कार्यरत आहेत. सदर ठिकाणी कामगारांचे दैनंदिन कामकाज व देखरेख सॅम सर्वेअर्स ऍण्ड ऍडजेस्टर्स कंपनीचे व्यवस्थापक पाहतात. सॅम सर्वेअर्स ऍण्ड ऍडजेस्टर्स यांनी गेली ४ महिने (जून २०२६ ते सप्टेंबर २०२६) चे बेकायदेशीर पध्दतीने कामगारांचे वेतन कपात केली आहे. त्याबद्दल त्यांच्या सोबत कामगारांनी वारंवार चर्चा करून सुध्दा कामगारांचे वेतन कपात करण्यात आली आहे. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष आहे.

Raigad Workers Protest
Mumbai Ahmedabad Bullet Train : बुलेट ट्रेनच्या विरार स्थानक परिसराचा होणार कायापालट

सर्व कामगारांवर आजपर्यंत सोपविण्यात आलेली कामे कामगार वर्ग प्रामाणिकपणे, जबाबदारीने व नियमीतपणे पार पाडत आले आहेत . तथापि, गेल्या काही महिन्यांपासून कामगारांच्या बाबतीत अत्यंत अन्यायकारक व गंभीर स्वरूपाची परिस्थिती निर्माण झाली असून कामगारांच्या आर्थिक, व कायदेशीर हक्कांवर गदा येत आहे. त्याबाबत सर्व कामगारांनी सामूहिक तक्रार नोंदवून तातडीने न्याय मिळण्यासाठी कामगारांनी आंदोलन सुरु केले आहे.

५ नोव्हेंबर २०२६ रोजी आंदोलनाचा पहिला दिवस होता. या पहिल्या दिवशी आंदोलन स्थळी कॉम्रेड तथा कामगार नेते भूषण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. भार्गव पाटील, भाजपचे रायगड जिल्हा माजी उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रेरणा कुणाल पाटील, उरण तालुका भाजपा उपाध्यक्ष विजय पाटील, सरपंच कुणाल पाटील, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष मनोहर पाटील, उपाध्यक्ष आशिष तांडेल, माजी अध्यक्ष प्रकाश भोईर, सेक्रेटरी रमेश पाटील, कामगार नेते अरुण पाटील,कामगार नेते विनोद पाटील, रायगड श्रमिक संघटनेचे अध्यक्ष प्राणनाथ पाटील, उपाध्यक्ष भूमीत भगत, सेक्रेटरी मितेश पाटील, खजिनदार जगदीश तांडेल,सदस्य भरत पाटील, विद्याधर ठाकूर, कलमार ऑपरेटर अजय कदम, पागोटे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, पागोटे ग्रामस्थ, कामगार वर्ग, महिला सफाई कामगार मोठया संख्येने उपस्थित होते.

Raigad Workers Protest
Western Railway Special Trains : पश्चिम रेल्वेवर धावणार सतरा नव्या मेल-एक्स्प्रेस

कामगारांच्या एकूण चौदा मागण्यात आहेत. त्यात सर्व कामगारांचे फेब्रुवारी २०२४ ते सप्टेंबर २०२६ पर्यंत रजेचे कार्ड भरणे व बाकी रजेचे इनकॅशमेंट द्यावे. झालेला कायदेशीर करारानुसार २०२६ चा बोनस ग्रॉस पेमेंट व १००० दिवाळीच्या ७ दिवस अगोदर जमा करावा. बेकायदेशीर ५ कामगार कमी केले आहेत, त्यांच्या जागी त्यांचे नातेवाइक घेण्याचे मान्य करून सुध्दा आजपर्यंत घेतले नाहीत, त्यांना कामावर घेणे. कामगारांना पूर्वी सकाळ व दुपार अशा दोन शीपमध्ये काम चालू असताना सद्यस्थितीत सर्वांना एक जनरल शीप केली आहे, ती पूर्वी प्रमाणे दोन शीपमध्ये करणे. सर्व कामगारांचे ४ दिवसांचे वेतन थकबाकी आहेत ते तातडीने अदा करण्यात यावे. ७ ते ८ कामगारांचे मेडीकल बील अंदाजे रक्कम ३ ते ४ लाख बाकी ते अदा करणे. कामगारांच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेण्यात यावे व प्रत्येक मागणीवर लेखी निर्णय देण्यात यावा, आदींची समावेश आहे.

तक्रारींची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी

मागील ४ महिन्यांतील प्रत्येक कामगारांची संपूर्ण वेतन थकबाकी निश्चित करून ती कायद्यानुसार तातडीने अदा करण्यात यावी. प्रत्येक कामगाराला वेतनाची गणना दर्शविणारे वेतनपत्रक, उपस्थितीचा तपशील व अदा केलेल्या रक्कमांचे अधिकृत विवरण देण्यात यावे. विजय शास्त्री यांच्याकडून होत असलेल्या मानसिक छळ, धमक्या, कामगारांना लक्ष्य करणे व प्रतिशोधात्मक वागणुकीच्या तक्रारींची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी करण्यात यात्री. सोनाली पाटील व स्नेहा पाटील यांच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही कामगाराला धमकविणे, दबाव आणणे किंवा तक्रारीशी संबंधित असल्यामुळे त्रास देणे तातडीने थांबविण्यात यावे. कोणत्याही कामगाराला बेकायदेशीररीत्या कामावरून कमी करणे, कामावर येण्यास अडथळा आणणे वेतन रोखणे किंवा खोट्या तक्रारींच्या आधारे त्रास देणे टाळण्यात यावे. सर्व कामगारांचे वेतन नियमीतपणे व निर्धारित मुदतीत (महिण्याच्या ७ तारखेला) अदा करण्याची लेखी हमी देण्यात यावी, आदी चौदा मागण्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.