Raigad News : धुतूमच्या आयओसी कंपनीकडे 547 कोटींची थकबाकी

सात दिवसात दंडात्मक पैसे भरण्याचे सिडको प्रशासनाचे आदेश
Raigad News
धुतूमच्या आयओसी कंपनीकडे 547 कोटींची थकबाकी
Published on
Updated on

जेएनपीए : उरण तालुक्यातील धुतुम येथील द्रोणगिरी नोड मधील इंडियन ऑईल टॅकिंग लिमिटेड कंपनीला भुईभाड्यापोटी थकविलेल्या 547 कोटी रुपये सात दिवसात भरण्याचे आदेश सिडकोने दिले आहेत. मुदतीत रक्कम न भरल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही सिडकोने कंपनीला नोटीसीव्दारे दिला आहे. द्रोणागिरी नोड मधील सेक्टर -1 मधील प्लॉट क्र. 101 वर इंडियन ऑईल टँक प्रकल्प आहे.धुतुम ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या या प्रकल्पातून 1996 पासून जेएनपीए बंदरातून परदेशातून आयात करण्यात येणाऱ्या तेलजन्य पदार्थांची साठवणूक करणाऱ्या लाखो किलो लिटर्सच्या टाक्या आहेत.

Raigad News
Raigad News : जेएनपीए मार्गावरील अवजड वाहतूक धोकादायक

या प्रकल्पांसाठी सिडकोने द्रोणागिरी नोड मधील सेक्टर -1 मधील प्लॉट क्रमांक 101 वरील भूखंड 17 ऑक्टोंबर 1996 साली भुईभाड्याने दिलेला आहे. मात्र तेव्हापासून भाड्याने दिलेल्या भूखंडाचे भाडे भरण्यात सातत्याने दिरंगाईच चालविली होती.क़ंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे शासनाचा अतोनात महसूल बुडत असल्याने रांजणपाडा-उरण येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते राम दशरथ पाटील यांनी सिडको, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत.मागील 15 वर्षांपासून तक्रारीतुन कंपनीने आराखड्याप्रमाणे बांधकाम केले नसल्याचे व बांधकामाला ओसीही दिलेली नाही.

Raigad News
Raigad News : तीन दशके झाली तरी साडेबारा टक्के भूखंड मिळेना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news