

कोप्रोली उरण : उरण येथील आवरे गाव येथे उपजिल्हा आरोग्य केंद्र उभारण्यात येत आहे. यामुळे येथील आवरे, गोवठणे आणि पाले या ग्रुप ग्रामपंचायतीमधील जनतेला याचा खास करून लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होणार असल्याचे बोलले जात आहे. उरण पूर्व विभागात या पूर्वी जिल्हा परिषदेचे कोप्रोली येथे मुख्य उप ग्रामीण आरोग्य केंद्र उपलब्ध असताना आता आवरे येथे नव्याने होऊ घातलेले उप जिल्हा आरोग्य केंद्र मात्र भलत्याच विषयाने चर्चेचा विषय बनला आहे . त्यामुळे हे आरोग्य केंद्र वेळेत पूर्ण होणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सदर आरोग्य केंद्र गावकीच्या गाजी बांधण्यात यावा (आमच्या मार्फत देत असल्याची जागा) तसेच शाळेची जागा वाचावी हा आमचा हेतू असल्याचे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सुभाष गावंड यांनी सांगितले आहे. परंतु ग्रामपंचायतीमार्फत आम्हाला योग्य ती मदत मिळत नाही, असे मत यावेळी गावंड यांनी बोलताना सांगितले. तर ग्रामपंचायत आवरेच्या मार्फत देण्यात आलेल्या माहितीप्रमाणे सदर उप जिल्हा आरोग्य हे केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेतील असल्याचे बोलले जात आहे.
तसेच शासनामार्फत मंजुरी 24 मार्च 2025 ला आली आहे आणि यासाठी 61.19 लक्ष निधी मंजूर झाला आहे. तर पुढे बोलताना ग्राम विकास अधिकारी वैशाली नागे यांनी सांगितले की, नवीन कमिटीमार्फत दाखविण्यात आलेली जागा ही शंकर मंदिर कमिटीच्या मालकीची असल्याने त्या जागी उप आरोग्य केंद्र उभारता येत नाही. जर ती जागा ग्रामपंचायतीच्या नावे झाली असती तर त्या जागी हे शक्य झाले असते. तर ग्रामपंचायतीच्या मार्फत याविषयी सुभाष गावंड आणि येथील जनतेला हा विषय सभेद्वारे बोलून दाखवले आहे.
या उलट मंदिर कमिटीची जागा वर्ग होण्यासाठी ग्रामपंचायत शक्यतो मदत करेल परंतु त्यासाठी स्वतः विरोध करणाऱ्यांनी ती जागा धर्मदाय विभागाकडून वर्ग करून ती जागा ग्रामपंचायतीच्या नावे करावी अशी सुचना केली होती परंतु तसे आजपर्यंत झाले नसल्याने आणि मंजूर निधी परत जाऊ नये म्हणून शासनाची असलेल्या जागी सदर आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे, असे नागे यांनी सांगितले.
ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि सरपंच यांनी त्यांचा कार्यकाळ असतानाच शाळेच्या जागेसहित परवानगी दिली होती तसेच त्या वेळच्या शाळा कमिटीनेही परवानगी दिली आहे फक्त या नव्याने स्थापन झालेल्या कमिटीकडून शाळेच्या जागेवर आरोग्य केंद्र उभारण्यात विरोध का होत आहे हे समजण्यापलीकडे आहे.
गावातील शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षणप्रेमींकडून जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे सूचित करण्यात आले होते. त्यात शाळेच्या आवारातील जुनी इमारत तोडून त्या जागी आरोग्य केंद्राचे बांधकाम करू नये अशी मागणी केली होती. शाळेच्या जुन्या इमारतीच्या ठिकाणी विविध कला गुणांसाठी, अभ्यासासाठी, पोषण आहाराचे जेवण घेण्याकरिता सामूहिक हॉल बांधता येईल. याकरिता आपल्या माध्यमातून निधी मिळावा हि विनंती त्यातून आमच्या गोर गरिबांच्या मुलांना चांगले शिक्षण घेता येईल.
शासनाकडून मार्च 2025 मध्ये मिळालेली मंजुरी
शासनामार्फत आलेली मंजूरी 24 मार्च 2025 ला आली आहे आणि यासाठी 61.19 लक्ष निधी मंजूर झाला आहे . तर पुढे बोलताना ग्राम विकास अधिकारी वैशाली नागे यांनी सांगितले की, नवीन कमिटी मार्फत दाखविण्यात आलेली जागा ही शंकर मंदिर कमिटीच्या मालकीची असल्याने त्या जागी उप आरोग्य केंद्र उभारता येत नाही. जर ती जागा ग्रामपंचायतीच्या नावे झाली असती तर त्या जागी हे शक्य झाले असते.