

रायगड ः अवकाळीचे थैमान रायगडात जोरात सुरूच आहे.ते कधी कमी होणार याची चिंता जशी बळीराजाला लागलीय,तशीच काळजी रायगडातील लाखो कोळीबांधवांनाही लागल्याचे जाणवत आहे.वादळीवाऱ्यामुळे मच्छीमारीसाठी खोल समुद्रात जाणे धोक्याचे ठरत आहे. त्यात पावसामुळे मच्छी सुकवायची कुठे याची मोठी चिंता लागलेली आहे.अवकाळीने बळीराजाला शिवारातील पीक कापता येईना आणि मच्छीमारांना अंगणात मच्छी सुकवितांना येईना,अशी दैन्यावस्था दोन्ही अन्नदात्यांची झालेली आहे.
रायगड हा भाताचा कोठार तसाच तो ताज्या म्हावऱ्यासाठीही प्रसिद्ध.दरवर्षी लाखो टन मच्छीची आयात,निर्यात होत असते.शिवाय सुक्या मच्छीचाही मोठा व्यवसाय येथे तेजीत चालतो.दसऱ्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाले की दारासमोरील अंगणात शिल्लक मच्छीचे वाळवण टाकले जाते.त्यात सुकट, जवळा, बोंबील, सोडे, कोळंबी, आंबाड,वाकटी, बांगडा यांचे वाळवण केले जाते.त्या सुक्या मच्छीला चवही असते आणि मागणीही भरपूर असते.
ओली मच्छी मिळाली नाही की मत्स्यहारींना सुक्या मच्छीची मेजवाणी मिळते.रायगडात दरवर्षी दिवाळीनंतर विविध देवांची यात्रा भरते. त्यातील साजगाव येथील यात्रा ही सुक्या मच्छीसाठी प्रसिद्ध आहे.दरवर्षी कोट्यवधींंचीउलाढाल या सुक्या मच्छीच्या विक्रीतून होत असते.पण यावेळी ऋतुचक्रच फिरल्याने पावसाने अजून काढता पाय घेतलेला नाही.उलट आषाढासारखा तो कोसळत आहे.तो अद्याप चार दिवस कोसळणार,असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
बदलत्या हवामानाचा परिणाम
अवकाळी पावसामुळे रायगडातील सुक्या मच्छीची आवक घटली आहे, कारण या पावसामुळे समुद्रात मासेमारीवर परिणाम झाला आहे. अवकाळी पाऊस आणि समुद्रातील हवामानातील बदलांमुळे पारंपरिक मासेमारीवर मर्यादा येतात, ज्यामुळे सुक्या मच्छीची आवक कमी झाली आहे.
मासेमारीवर परिणाम: अवकाळी पाऊस आणि समुद्रातील खराब हवामानामुळे पारंपरिक मासेमारी आणि बोटिंगवर परिणाम होतो. अवकाळी पावसामुळे समुद्रातून मिळणाऱ्या माशांच्या आवकेत घट झाली आहे, परिणामी सुक्या मच्छीची आवक कमी झाली आहे. या स्थितीमुळे सुक्या मच्छीच्या उत्पादनावरही परिणाम झाला आहे.