

महाड ः मागील दोन आठवड्यापासून अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील भात शेती धोक्यात आली असून 976 गावातील.2 हजार807.52 हेक्टर क्षेत्रावरील भात शेतीचे नुकसान झाले आहे. कृषी व महसूल विभागाकडून शेतीचे नुकसानीचे पंचनामे चालू झाले असली तरी नक्की मदत कधी मिळणार अशी विचारणा होत आहे. हातात तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून गेल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे.
भारताचे कोठार म्हणून गणल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून नेल्याने वर्षभर काय करायचे या विवांचाने जिल्ह्यातील शेतकरी असून शासनाने पंचनामे जरी चालू केले असले तरी नेमकी किती नुकसान भरपाई मिळणार याबाबत कोणतेही स्पष्टता नसल्याने शेतीवर झालेल्या खर्चाच्या पोटी शासनाकडून मिळणारी मदत ही तोंडाला पाणी पुसणारीच असणार असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.
रायगड जिल्ह्यात कृषी विभागामार्फत 1 ऑक्टोंबर पासून26. ऑक्टोंबर पर्यंत झालेल्या मोसमी पावसामुळे जिल्ह्यातील 15 तालुक्यातील976. गावातील8716. शेतकरी आतापर्यंत झालेल्या पंचनाम्यात बाधित असून जिल्ह्यातील 2 हजार 807.52 हेक्टर क्षेत्र बाधित असल्याचे आतापर्यंत केलेल्या पंचनाम्यात स्पष्ट झाले आहे.
रायगड जिल्ह्यात विधानसभेचे 7 आमदार असून त्यातील दोन राज्यातील मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री पदाचे मंत्री आहेत तर दोन लोकसभेचे खासदार व एक राज्यसभेचे खासदार असतानाही व सर्वच लोकप्रतिनिधी हे सत्ताधारीचे पक्षाचे असतानाही अवकाळी पावसाने नुकसान झाले असताना देखील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांचे कसे नुकसान झाले आहे याचा पाहणी एकही लोकप्रतिनिधी करताना दिसत नाही. यामुळे शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
ओल्या दुष्काळाची मागणी
रायगड जिल्ह्यासह कोकणात अवकाळी पावसाने धुमाकूळ माजवला असून संपूर्ण भात शेती बरोबर नाचणी व वरी या पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे शासनाने सरसकट शेतीचे नुकसान धरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ओला दुष्काळ म्हणून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.