

पोलादपूर : लग्नसराईत पूर्वीच्या काळी जेवणाची पंगत जमिनीवर खुर्ची टेबल वर बसायची मात्र बदलत्या युगात त्याची जागा बुफे पद्धतीने घेतली आहे. लग्नसराईच्या हटके पद्धतीत बुफे पद्धतीला मान देण्यात येत असल्याने ग्रामीण भागात सुद्धा पंगतीच्या जागी बुफे पद्धत जास्त प्रमाणात दिसून येत आहे. त्याच प्रमाणे सभागृहासह ओपन लॉनवर शुभमंगलला पसंती मिळत आहे. त्या जोडीला संगीतमय मंगलाष्टकांची रेलचेल आहे. बाहेरील बाजूस फोटो सेक्शनसाठी विविध आकर्षक सजावट करण्यात येत असून लग्नसमारंभ हा इव्हेंट ठरत आहे.
तुळशी विवाहनंतर खऱ्या अर्थाने लग्नसराईला सुरुवात झाली असून बाजारपेठांना लग्नसराईचा साज चढू लागला आहे. विवाह समारंभांसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंच्या खरेदीसाठी महाड बाजारपेठसह देण्याघेण्या च्यावस्तू साठी मुंबई- दादर, पुणे आदी ठिकाणी जात असल्याने वधूवर कडच्या मंडळींची गर्दी दिसून येत आहे.
यावर्षी 16 नोव्हेंबरपासून लग्नाचा बार उडण्यास सुरुवात झाली असून 6 मुहूर्त आहेत. डिसेंबरमध्ये 2 व 5 रोजी मुहूर्त आहेत तर 2026 हे वर्ष लग्न आणि शुभ कार्यासाठी खूपच चांगले असल्याचे ज्योतिषांकडून सांगितले जात आहे. 2026 या वर्षात एकूण 59 शुभ मुहूर्त आहेत. या तारखांना लग्नासाठी खूपच चांगल्या असणार आहे.
2026 या वर्षाची सुरुवात शुभ कार्यांच्या बाबतीत थोडी मंद असेल कारण एकीकडे जानेवारीमध्ये खरमास असेल तर दुसरीकडे शुक्र ग्रह मावळत असेल. यामुळेच वर्षाच्या पहिल्या महिन्यात एकही लग्नाचा मुहूर्त नसणार आहे. पण फेब्रुवारी महिना सुरू होताच पुन्हा लग्नाचा शुभ मुहूर्त सुरू होईल. पंचांगानुसार, 2026 या वर्षात एकूण 59 शुभ विवाह मुहूर्त असतील. या मुहूर्तावर लग्न करणे हे चांगले असते.
लग्न सराईसाठी सभागृहासह लॉन,हॉटेल व्यवसायिक सज्ज झाले आहेत. सद्य स्थितीत लग्नाचा ट्रेंड बदलत चालल्याने लॉन मोकळ्या जागेत सायंकाळी बहुतांशी लग्न उरकण्यात येत आहे. या ठिकाणी विविध पदार्थ याची रेलचेल असते मोठ्या शहरातील शाही विवाहाची परंपरा ग्रामीण भागात रुज्जू पाहत असल्याने या ठिकाणी राबणाऱ्या अनेक जणांना सुगीचे दिवस आले आहेत.
लग्न सराईमध्ये जेवणावळीमध्ये पंजाबीसह चायनीज पदार्थाची रेलचेल आहे. त्याच्या जोडीला जेवणावळीनंतर पान-मसालासह आईस्क्रीम जोडीला असते मोठ्या शहराप्रमाणे ग्रामीण भागात सुद्धा ही पद्धत जोर धरू लागली आहे.पंगत बसलाय व वाढायला जेवढा वेळ लागतो त्या पेक्षा कमी वेळात शेकडो माणसे बुफे पद्धतीत जेवण जेवून बाहेर पडत असतात त्याच प्रमाणे बसण्याची आकर्षक रचना असते बुफे स्टोल वर हवे तसे घेता यते या मुळे ही पद्धत सर्वत्र दिसून येत आहे.
लग्नाचे स्वरूप बदलले
एका लाईनमध्ये जेवणाची पंगत बसायची व वाढपी एक मार्ग पदार्थ वाढत सुटायचे, पाणीवाला पाणी देत असे असा शिरस्ता पूर्वी लग्न पद्धतीत दिसायचा त्या काळी बुफे पद्धत नव्हती ती काय असते हे ग्रामीण भागात माहिती सुद्धा नसायचे मोठ्या शहरात निम शहरात अधून-मधून ही बुफे पद्धत असत. मात्र गेल्या काही वर्षांत लग्नाचे स्वरूप बदलले त्याचप्रमाणे जेवणाची पंगत पद्धत बदलली खर्च हवा तसा करण्याची तयारी असल्याने समाज बदलत चाललाय हे प्रकर्षाने जाणवायला लागला आहे.