

Unknown Youth Body Found in Varathi Roha
रोहे: रोहा तालुक्यातील वराठी - बेलवाडी रस्त्यावरील क्रिकेट ग्राउंड जवळ अंदाजे २५ ते ३० वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला. ही घटना गुरूवारी (दि. ८) रात्री साडेआठच्या सुमारास समोर आली. यामुळे रोहा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन रोहा पोलिसांनी तपास सुरू केला . रोहा पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रोहा पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार के. भोईर अधिक तपास करत आहेत. या संबंधित कोणतीही अधिक माहिती मिळताच रोहा पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन रोहा पोलिसांनी केले आहे.