

पोलादपूर: बाजारात पावसाळी साहित्य घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे मात्र पाऊस लांबला असल्याने उन्हाच्या त्रासापासून सावलीचा आसरा म्हणून छत्री हवीच यासाठी काही दुकानात वर्षेभर छत्री उपलब्ध असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या वर्षी मोठ्या प्रमाणात विविध रंगी चायना मेडसह भारतीय बनावटीच्या छत्र्या बाजारात दाखल झाल्या आहेत. पाऊस नाहीतर उन्हापासून संरक्षण म्हणून छत्र्यांचा उपयोग होत आहे.
महाडसह पोलादपूरमध्ये विविध रंगी छत्री रेनकोट दाखल झाले असून बाजारात खरेदीसाठी गर्दी होत आहेत. गत वर्षी मे महिन्यात पावसाने आपले आगमन जोरदार दाखवले होते त्यावेळी अनेक ग्राहकांनी मे महिन्यात साहित्य खरेदी केले होते तर अनेक ग्राहक जून महिन्यात नवनवीन प्रकारच्या छत्र्यांसह रेनकोट खरेदी करण्यासाठी बाजारपेठ खरेदी करत होते मात्र या वर्षी अद्याप पाऊस सुरू झाला नसल्याने रेनकोटची खरेदीला फटका बसला आहे.
छत्री मात्र उन्हापासून संरक्षण करते म्हणून विकली जात आहे. त्याच प्रमाणे कौलारू घरावर टाकण्यात येणारी ताडपत्री गाड्यावरी ताडपत्रीला मोठी मागणी आहे.पुरुषांच्या बहुतांश छत्र्या एकच घडीच्या असतात. त्यात सुद्धा मोठया छत्र्या विविध कलर रुपी दाखल झाल्या आहेत.
त्याच प्रमाणे तीन घडी करून अगदी लहान आकार होणाऱ्या छत्र्यादेखील दाखल झाल्या आहेत. अशा लहान छत्र्यादेखील यंदाचे आकर्षण राहणार आहे. तसेच महिलांच्या रंगीबेरंगी आणि बालकांच्या कार्टुन्सच्या चित्रांनी सजलेल्या छत्र्यांचा आकर्षक लूक ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
कार्टून प्रिंटच्या रेनकोट्सला मागणी
लहान मुलांमध्ये आकर्षण असलेल्या कार्टूनची प्रिंट असलेले रेनकोट्सदेखील मार्केटमध्ये दाखल झाले आहेत. त्यात डोरेमॉन, स्पायडर मॅन, बेन टेन, नोबिता अशा विविध कार्टून्सची चित्र असलेल्या रेनकोट्सचे आकर्षण मुलांमध्ये असल्याचे विक्रे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर छोटा भीम, शक्तिमान यांसारख्या सुपर हिरोंच्या रेनकोट्सनादेखील बाजारात मागणी वाढण्याची शक्यता विक्रते कडून व्यक्त करण्यात येत आहे.