Poladpur Bus Accident | पोलादपूरजवळ दोन बस - टेम्पोची धडक; प्रवासी जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर एसटी बस अपघातांची मालिका सुरूच
Two Buses Tempo Crash
मुंबई-गोवा महामार्गावर एसटी बस अपघातांची मालिका सुरूचPudhari
Published on
Updated on

Two Buses Tempo Crash

पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावर एसटी बस अपघातांची मालिका सुरूच असून, शुक्रवारी (दि.२४) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास पोलादपूरजवळ तीन वाहनांचा अपघात झाला. या अपघातात एका महिला प्रवाशासह काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल झालेली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलादपूर बसस्थानकातून बोरिवलीकडे निघालेली एसटी बस मुंबई-गोवा महामार्गावर महाडच्या दिशेने जात होती. हॉटेल राजमुद्रा परिसरात आल्यानंतर चालकाला बसवरील नियंत्रण राखता न आल्याने समोरून जात असलेल्या चिपळूण–बदलापूर एसटी बसला मागील बाजूने धडक बसली. या धडकेमुळे चिपळूण–बदलापूर बस समोरील मालवाहू टेम्पोवर आदळली आणि सलग तीन वाहनांचा अपघात झाला.

Two Buses Tempo Crash
Raigad News : रायगडातील ५५० शेतकऱ्यांना मत्स्यबीज वाटप; सागरी मत्स्य उत्पादनाला ‘वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट’चा दर्जा

प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, महामार्गावर अचानक मोकाट गुरे आल्याने त्यांना वाचविण्यासाठी मालवाहू टेम्पो चालकाने वाहनाचा वेग कमी केला. त्यामागील चिपळूण–बदलापूर एसटी बसनेही वेग नियंत्रित केला; मात्र त्यामागून येणाऱ्या पोलादपूर–बोरिवली बसच्या चालकाला वेळेत वाहनावर नियंत्रण मिळविता आले नाही. त्यामुळे हा अपघात घडला.

या अपघातात वसुधा वीर दीक्षित (वय ५०) या महिला प्रवाशाच्या नाक व तोंडाला किरकोळ दुखापत झाली. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले. तसेच इतर काही प्रवाशांनाही किरकोळ मार लागल्याचे सांगण्यात आले.

Two Buses Tempo Crash
Raigad rain update: रायगडमध्ये पावसाचा जोर कायम; माथेरानमध्ये सर्वाधिक १५७.४ मिमी नोंद

अपघातानंतर दोन्ही एसटी बस महामार्गाच्या कडेला उभ्या करण्यात आल्या होत्या. दुपारपर्यंत अपघातग्रस्त वाहने घटनास्थळी असल्याचे दिसून आले. दरम्यान, या प्रकरणी कोणतीही अधिकृत तक्रार दाखल नसल्याने काही प्रवाशांनी पर्यायी वाहनांनी पुढील प्रवास केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news