Khalapur tribal protest : खालापूर तालुक्यात आदिवासींचा रस्त्यासाठी एल्गार

आत्मदहनाचा इशारा, कुटुंबांसह ठिय्या आंदोलन, लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे
Khalapur tribal protest
खालापूर तालुक्यात आदिवासींचा रस्त्यासाठी एल्गारpudhari photo
Published on
Updated on

खोपोली ः खालापूर तालुक्यातील माडप मुठा ठाकूरवाडीतील आदिवासी बांधवांनी रस्त्यासाठी एल्गार केला असून,रस्ता न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा देत कुटुंबासह ठिय्या आंदोलन केल्यान येथील वातावरण काहीकाळ तंग बनले होते.

600 हुन अधिक आदिवासी बांधवांची वस्ती असणाऱ्या माडप मुठा ठाकूरवाडी च्या रस्त्याला मुख्यमंत्री सडक योजनेतून 9 कोटी निधी मंजूर करून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर वाजत गाजत आमदार महेंद्र थोरवे यांनी भूमिपूजन करून कामाला सुरुवात केली होती. मात्र हा फक्त दिखावच केला आणि रस्त्याची अवस्था जैसे थे च राहिल्याने नागरिकांची भावना झाल्याने येथील आदिवासी बांधवाच्या संयमाचा बांध फुटला आणि 4 किमी डोंगरातून दरमजल करीत येथील पुरुष महिला आणि तरुण वर्ग आपल्या लहान मुलांसह प्रशासनाला जाग आणण्यासाठी डोंगरातून खाली येत रोष व्यक्त केला.

Khalapur tribal protest
Shaktipeeth Highway Protest : भूमिहीन करणारा शक्तिपीठ आम्हाला नको

गावच्या वेशी जवळ ठिय्या मांडून सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा देत आदिवासी बांधव आक्रमक झाले. मात्र चार तासाच्या आंदोलना नंतर प्रशासनाने या रस्त्याचे काम तात्काळ सुरुवात करीत असल्याचे लेखी पत्र दिल्याने आंदोलनाला स्थगिती दिली,

वन विभागाच्या हद्दीत असलेल्या या आदिवासीवाडीच्याअनेक समस्या आहेत. त्यामुळे अनेक अडचणींवर मात करीत प्रशासनाकडून वन विभागाच्या परवानगी घेऊन 9 कोटी निधी मंजूर झाला. काँक्रेटिकरण करण्यासाठी मंजुरी मिळाली. मात्र या मार्गावर काँक्रेटिकरण न करता डांबरीकरण करावे असे या रस्त्याचा ठेका घेतलेले ठेकेदाराचे म्हणणे होते.

मात्र वन विभागाच्या अधिकारी वर्गाने अशी कोणतीच अट नाही आमची रस्त्याच्या कामाला कोणतीच अडचण नसल्याचे जिल्हा परिषद सदस्य संतोष बैलमारे यांनी विचारणा केली असता सांगितले. त्यामुळे ठेकेदार वसीम खान ए जी सी कन्ट्रक्शन संभाजीनगर यांचे बिग उघडे पडल्याने आदिवासी बाधबांचा पारा अधिकच चढला आणि आदिवासी बांधव सुद्धा माणूस हाय ,आमचा रस्ता पूर्ण करा नाहीतर खुर्च्या खाली करा रस्त्याच्या कामाला सुरुवात करा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

Khalapur tribal protest
Hetawane Dam: हेटवणे प्रकल्पामुळे आदिवासी जलस्रोत कोरडे; विवेक पंडितांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले

यावेळी जिल्हा परिषद सदस्य संतोष बैलमारे पोलीस निरीक्षक सचिन पवार उप अभियंता आर के चव्हाण कनिष्ठ अभियंता निकिता गुरव स्थापत्य अभियांत्रिक साह्यक राहुल चौरे माजी उपसभापती विश्वनाथ पाटील, सरपंच अर्चना पाटील कमलाकर पाटील, नितीन पाटील, पोलीस पाटील राजेश पाटील, बाळू चव्हाण, सतीश घोडविंडे, संदेश सांबारे, रवींद्र पाटील, राकेश पाटील, जयवंत पाटील, मंगेश पाटील, सुरज पाटील, विशाल बारस्कार ,सुनील वारे, पांडू वारे, राम वारे, नरेश निरगुड, वामन निरगुडा, यशवंत वाघ नारायण, नारायण वाघ, गणेश होला, गणेश वाघ, शनिवारा काबडी, जगन वाघ, जानू वारे,राम वारे आदी उपस्थित होते.

कामाला तात्काळ सुरुवात

माडप ठाकूरवाडी रस्त्यासादर्भात जिल्हा परिषद सदस्य संतोष बैलमारे यांनी दूरध्वनी मार्फत रस्ते मंडळाचे अधिकारी व ठेकेदाराशी एकत्र चर्चा केली असता तात्काळ उद्यापासून सर्व यंत्रणा रस्त्याच्या कामाला पाठवून सुरुवात केली जाईल पावसाळा तोंडावर असला तरी जळत गतीने यारस्त्याच्या कामाला सुरुवात करून शक्य तेवढे पूर्ण केला जाईल असे आश्वासन दिले आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news