Tobacco Free School : दिलासादायक ! रायगड जिल्ह्यामध्ये 401 शाळा झाल्या तंबाखूमुक्त

शाळांच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी; उपक्रमास अल्पप्रतिसाद
रायगड
रायगड : तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे दुष्पपरिणाम शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांना कळावे, यासाठी शाळांमध्ये तंबाखूमुक्तशाळा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. pudhari news network
Published on
Updated on

रायगड : तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे दुष्पपरिणाम शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांना कळावे, यासाठी शाळांमध्ये तंबाखूमुक्तशाळा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मोठा गाजावाजा करीत तंबाखूमुक्त शाळा म्हणून फलक लावले जातात. परंतु, हा सर्व खर्च पाण्यात जात असल्याचे चित्र आहे.

तंबाखू मुक्त शाळेतील काही कर्मचारीच गुटखा व अन्य तंबाखूजन्य पदार्थ खात असल्याचे समोर येत आहे. तसेच, शाळेच्या शंभर मीटर परिसरात किराणा, पान टपरी दुकानांत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खुले आमपणे विकले जातात. त्याकडे मात्र शाळेतील समितीचे दुर्लक्ष असल्याचे बोलले जात आहे.

संबंधितांविरोधात कोणतीही कारवाई केली जात नाही, ही मोठी चिंतेची बाब आहे. तंबाखूच्या सेवनाने कर्करोगासह अनेक आजार उद्भवण्याची शक्यता आहे. गुटखा व अन्य तंबाखूजन्य पदार्थाच्या आहारी तरुण वर्ग जात आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील तंबाखू व गुटखा सारखे तंबाखूजन्य पदार्थ विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. मात्र, आजही जिल्ह्यातील काही भागांमध्ये ३५ ते ४० रुपयांनी विमल, गुटखा या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री छुप्या पद्धतीने केली जात आहे. त्यामुळे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या आहारी तरुणाई जाण्याची भिती निर्माण झाली आहे.

रायगड
World No Tobacco Day 2025 | सिगारेट आजच सोडा, अन्‍यथा आई-बाप होण्‍याचे स्‍वप्‍न विसरा!

काही शाळा, महाविद्यालयातील मुले फॅशन म्हणून तंबाखूजन्य पदार्थ खाण्याकडे वळत आहेत. त्यामुळे हे सरकारी कार्यालयांमध्येदेखील प्रचार शाळा महाविद्यालयात जाऊन या यंत्रणेच्या मदतीने जनजागृती केली जाते. सरकारी कार्यालयामध्येदेखील याबाबत प्रचार व प्रसार करून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाऊ नका, असे आवाहन केले जाते. जिल्ह्यात आतापर्यंत ४०१ शाळा तंबाखू मुक्त झाल्या आहेत. ७६ शाळा तंबाखू मुक्त शाळेच्या प्रगती पथावर आहेत. तंबाखूमुक्त शाळांच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी असून शाळांमधील कर्मचाऱ्यांनी देखील अशा पदार्थांचे सेवन न करणे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

संकट दूर करण्यासाठी जिल्ह्यात तंबाखू नियंत्रण कार्यक्रम ही स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात आली आहे. तसेच, शाळेच्या आवारात तंबाखूमुक्त शाळेचा फलक लावण्यात आला आहे. परंतु, नव्याचे नऊ दिवस या उक्तीप्रमाणे कारभार चालला जातो. त्यानंतर जैसे थे अशी अवस्था पहावयास मिळत आहे. मोठा गाजावाजा करीत तंबाखूमुक्त शाळेचा दिखावा केला जात असल्याचे चित्र काही शाळांमध्ये समोर आले आहे. त्यामुळे तंबाखूमुक्त शाळेची नोंद फक्त कागदावर असल्याचे बोलले जात आहे. तंबाखू मुक्त शाळेचा उपक्रम कौतूकास्पद आहे. मात्र, त्यामध्ये सातत्य राखण्यास काही शाळा उदासीन ठरत आहे.

रायगड
Tobacco ban: ‘यल्लम्मा’त गुटखा, तंबाखूवर बंदी

जिल्हा तंबाखू सहनियंत्रण समिती अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत. दर तीन महिन्यांनी बैठक घेतली जाते. या समितीमध्ये १५ हन अधिक सदस्य आहेत. त्यात पोलीस यंत्रणेसह शिक्षणाधिकारी, विक्रीकर अधिकारी, अन्न व औषध प्रशासनचे अधिकारी आहेत. आतापर्यंत चार बैठका झाल्या. परंतु, माध्यमिक शाळेतील शिक्षणाधिकारी चारही बैठकीला उपस्थित राहिले नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

सरकारी कार्यालयांमध्ये देखील प्रचार

शाळा महाविद्यालयात जाऊन या यंत्रणेच्या मदतीने जनजागृती केली जाते. सरकारी कार्यालयामध्येदेखील याबाबत प्रचार व प्रसार करून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाऊ नका, असे आवाहन केले जाते. जिल्ह्यात आतापर्यंत ४०१ शाळा तंबाखू मुक्त झाल्या आहेत. ७६ शाळा तंबाखू मुक्त शाळेच्या प्रगती पथावर आहेत. तंबाखूमुक्त शाळांच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी असून शाळांमधील कर्मचाऱ्यांनी देखील अशा पदार्थांचे सेवन न करणे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news