समुद्र खवळला ! खराब हवामानामुळे 250 बोटी किनार्‍याला

मुसळधार पावसामुळे पहिल्याच हंगामात मोठा फटका
उरण (रायगड)
खराब हवामानामुळे दोन दिवसांत 250 मच्छीमार बोटी मासेमारी न करताच विविध बंदरांत परतल्या Pudhari News Network
Published on
Updated on

उरण (रायगड) : शुक्रवारपासून (दि.15) सुरू असलेला वादळी पाऊस आणि खराब हवामानामुळे दोन दिवसांत 250 मच्छीमार बोटी मासेमारी न करताच विविध बंदरांत परतल्या आहेत. यामुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे.

उरण (रायगड)
Fishing ban extension demand : मासेमारी बंदी कालावधी वाढवण्याची मागणी

मासेमारी बोटी माघारी, बंदरांचा घेतला आश्रय

बंदी उठल्यावर मासेमारी हंगाम सुरू झाला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने खोल समुद्रात मासेमारी करणार्‍या शेकडो बोटी विविध बंदरातून मासेमारीसाठी रवाना झाल्या होत्या. मात्र, शुक्रवारपासून सुरू झालेला वादळी पाऊस व खराब वातावरणामुळे शेकडो मासेमारी बोटी शुक्रवारपासूनच (दि.15) माघारी येण्यास सुरुवात झाली. 250 मच्छीमार बोटींनी जयगड, दाभोळ, रत्नागिरी, रायगडमधील अलिबाग, रेवदंडा आदी बंदरांचा आश्रय घेतला.खराब हवामानाची स्थिती अशीच राहणार आहे त्यामुळे 22 ऑगस्टपर्यंत मासेमारी बंद राहणार आहे.

मच्छीमारांना मिळालेल्या आदेशानुसार येत्या 22 ऑगस्टपर्यंत वादळी पाऊस व खराब हवामानाची स्थिती अशीच राहणार आहे, त्यामुळे 22 ऑगस्टपर्यंत खोलसमुद्रातील आणि पर्सेर्सियन मासेमारी बंद ठेवावी लागणार आहे.

रमेश नाखवा, संचालक, वेस्ट कोस्ट पर्ससीन नेट असोसिएशन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news