Airport Road Project : ठाणे-नवी मुंबई विमानतळ उन्नत मार्ग प्रकल्पाला मंजुरी

ठाणे ते नवी मुंबई विमानतळाचे अंतर ३० मिनिटांत गाठणे शक्य होणार
Thane Navi Mumbai airport road project
ठाणे-नवी मुंबई विमानतळ उन्नत मार्ग प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
Published on
Updated on

पनवेल : ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) seamless elevated road corridor प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दिला आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्वावर BOT (Build-Operate-Transfer) पद्धतीने हा महत्त्वाकांक्षी मार्ग उभारण्यात येणार असून, या प्रकल्पासाठी तब्बल ६,३६३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

Thane Navi Mumbai airport road project
MNS Protest Panvel| नवी मुंबई विमानतळ नामकरणावरून मनसे आक्रमक: पनवेल महापालिकेच्या हद्दीतील फलकाला फासले काळे

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा ऑक्टोबर तसेच नोव्हेंबर २०२५ अखेरपर्यंत कार्यान्वित होणार असल्याने दररोज जवळपास २० लाख प्रवाशांचा ताण अपेक्षित आहे. या प्रवासात ठाणे व मुंबई उपनगरांतील प्रवाशांना सोयीस्कर व जलद मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी उड्डाण मार्गाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. २५.२ किलोमीटर लांबीचा हा उड्डाण मार्ग तसेच सहा लेन एलिव्हेटेट कॅरीडोर ठाणे ते NMIA असा थेट प्रवास साधणार आहे. यामध्ये ठाणे येथून सुरुवात होऊन कळवा, घणसोली, महापे, पनवेल मार्गे थेट विमानतळापर्यंत पोहोचणारा कोरिडॉर उभारण्यात येणार आहे. या मार्गात ठाणे-पनवेल हायवे, एमआयडीसी तळोजा व उरण येथून महत्त्वाचे इंटरचेंज पॉइंट्स जोडले जातील.

सुमारे ३० मिनिटांपेक्षा कमी वेळेत NMIA गाठणे शक्य होईल, अशी योजना आहे. या उड्डाण मार्गामुळे ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी आदी भागांतील प्रवाशांना विमानतळ गाठणे सोपे होणार आहे. याशिवाय पूर्व-पश्चिम कोरिडॉरमुळे मुंबई व नवी मुंबईच्या दोन्ही भागांतील प्रवाशांनाही जलद जोडणी मिळणार आहे. प्रकल्पासाठी BOT मॉडेलनुसार ६० टक्के हिस्सा खासगी कंत्राटदार उभारणार असून, उर्वरित ४० टक्के खर्चात राज्य सरकार व केंद्र सरकारकडून प्रत्येकी २० टक्के Viability Gap Funding (VGF) स्वरूपात मदत मिळणार आहे. मार्गातील जमिनींचे अधिग्रहण व विकासात्मक योजना देखील शासनाच्या अधिपत्याखाली राबवल्या जाणार आहेत. “महत्त्वाच्या नागरी परिवहन प्रकल्प” म्हणून या योजनेची नोंदणी करण्यात आली असून, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडेल आणि NMIA पर्यंत प्रवासाचा कालावधी व खर्च दोन्ही लक्षणीयरीत्या कमी होतील, असा शासनाचा दावा आहे.

उन्नत मार्ग

हा प्रकल्प सुमारे २५.२ किमी लांबीचा असून सहा-लेनचा एलिव्हेटेड कॉरिडॉर ठाणे आणि वायव्य उपनगरातील प्रवाशांना प्रस्तावित ठाणे कोस्टल रोड भाग २ आणि कोपरी पटणी पुलाद्वारे जोडणाऱ्या एनएमआयएपर्यंत थेट आणि अखंड प्रवेश प्रदान करण्यासाठी डिझाइन केला आहे. ठाणे आणि एनएमआयए दरम्यानचा प्रवास वेळ अंदाजे ४० मिनिटांनी कमी होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे आधीच गर्दी असलेल्या ठाणे बेलापूर रोडवर सध्याचा १.५ तासांचा प्रवास कमी होण्यास मदत होईल. या कॉरिडॉरमध्ये सहा प्रमुख इंटरचेंज असतील. जे कोपरी पटणी पूल, घणसोली ऐरोली क्रीक ब्रिज, कांजूर मार्ग-कोपर खैरणे लिंक रोड, वाशी येथील सायन पनवेल हायवे, पाम बीच मार्ग आणि उलवे कोस्टल रोड या प्रमुख लिंक्सना जोडतील. हे रस्ते मुंबई आणि नवी मुंबई प्रदेशादरम्यान (पूर्व-पश्चिम) आणि (उत्तर-पश्चिम) कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करतात जे या प्रदेशासाठी एक महत्त्वाचा गतिशीलता दुवा म्हणून काम करतात. हा उन्नत मार्ग उलवे कोस्टल रोडशी विलीन होतो जो पुढे थेट एनएमआयए टर्मिनल्सला एका उन्नत लिंकद्वारे जोडतो. वेग १०० किमी/ताशी वाहनांच्या वेगासाठी डिझाइन केलेले आहे.

Thane Navi Mumbai airport road project
नवी मुंबई विमानतळ परिसरातील उंच इमारती बेकायदेशीर कशा? : उच्च न्यायालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news